औरंगाबाद :स्थानिक गुन्हेशाखा यांनी देवगिरी एक्सप्रेसवर चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. मिळालेल्या माहिती नुसार दिनांक :२२/४/२०२२ रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपी याने पोटुळ रेल्वे स्टेशन येथील सिग्नलचे कनेक्शन कट करून देवगीरी एक्सप्रेस थांबवुन गाडीवर दगडफेक करून चोरटयांनी खिडकीमध्ये हात टाकुन महीला प्रवासी यांच्या गळयातील सोन्याची चैन वजन ३५ ग्रॅम किमंत अं. २५०००० रू ची जबरीने ओढुन घेउन चोरून पळुन गेले. याबाबत महिला यांनी दिलेल्या फिर्याद वरून रेल्वे पोलीस ठाणे औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.मा मोक्षदा पाटील पोलीस अधिक्षक लोहमार्ग औरंगाबाद यांनी लागलीच रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीसांची तातडीची बैठक घेवुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी योग्य त्या सुचना देवून आरोपीचा शोध घेण्याचे सांगितले त्यावरून रेल्वे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत होते . लोहमार्ग पोलीसांनी औरंगाबाद शहरात आणि बाजुच्या परीसरात गोपनिय बातमीदार नेमुण ठेवले होते. त्याचआधारे सपोनि श्री प्रशांत गंभीरराव यांना दिनांक २६.०४.२०२२ रोजी गुप्त बातमी मिळाली की,औरंगाबाद शहरातील सिडको एन-७ भागामध्ये काही इसम हे चोरीची सोन्याची चैन विकी करण्यासाठी आले आहे. सदर बाबत अधिक माहिती घेतली असता वरिल प्रमाणे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेला इसम हा वाळुज गायराण भागात राहणारा कुख्यात आरोपी शिवानंद ठकसेन काळे वय ४० वर्ष असल्याचे समजले त्यावरुन वरून सपोनि / गंभीरराव यांनी तपासाची चक्रे फिरवली, तांत्रीक पुराव्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा शिवानंद काळे याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाले. नमुद आरोपीचे शोध कार्य सुरू केले परंतु आरोपी हा सराईत असल्याने तो पोलीसांचे हालचालीवर लक्ष ठेवुन होता व तो सातत्याने त्याचे लोकेशन बदलत होता. त्यामुळे तो पोलीसांचे हाती लागत नव्हता.दिनांक ०१.०५.२०२२ रोंजी सपोनि / गंभीरराव यांना गुप्तबातमीदाराकडुन आरोपीचा सुगावा लागला आरोपी वसाहत सोडुन बाहेरगावी जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थागुशा व रेल्वे पोलीस ठाणे औरंगाबाद यांचे संयुक्त तपास पथक तयार करण्यात आले .नमुद पथकाने वाळुज गायराण वस्तीकडील रोडलगत सापळा रचला. तपास पथक झाडे झुडपांचा आडोसा घेउन आरोपीची वाट पाहत होते त्याचवेळी नमुद आरोपी वाळुज गायराण वसाहतीकडे मोटार सायकल वर जाताना दिसुन आला व तो शिवानंद ठकसेन काळे हाच असल्याची खात्री करण्यात आली व तपास पथकाने त्यास लागलीच पकडुन ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयातील चोरी गेलेल्या सोन्याची चैन ही वरखेड ता नेवासा जि अहमदगर येथे विकी केल्याचे सांगीतले. आरोपीचा सांगण्यावरून नमुद ठिकाणावर जावुन चोरीची गेलेली सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. नमुद आरोपीविरूध्द विविध पोलीस ठाण्यात खुन,जबरी चोरी,दरोडा तसेच अवैध अग्णीशस्त्रे बाळगणे असे गुन्हे दाखल असुन काही गुन्हयामध्ये तो फरार आहे .नमुद आरोपीच्या अटकेमुळे मोठया प्रमाणावर चोरीचे / जबरी चोरीचे/दरोडयाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .
सदरची धाडसी कार्यवाही ही मा.मोक्षदा पाटील पोलीस अधिक्षक लोहमार्ग औरंगाबाद व मनोज पगारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुरेश भाले, सपोनि श्री प्रशांत गंभीरराव,सफौ / श्री.शकर राठोड,पोना/ प्रमोद जाधव,पोना/प्रशांत मंडळकर,पोशि/सुरज गभणे सर्व नेम रथागुशा लोहमार्ग औरंगाबाद तसेच रेल्वे पो.स्टे.औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक श्री साहेबराव कांबळे,सपोनि श्री अमोल देशमुख,पोह / राहुल गायकवाड,मपोह / सोनाली मुंढे यांनी केली आहे. लोहमार्ग पोलीस तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी केलेल्या या उल्लेखनीय व धाडसी कार्यवाही करीता मा.मोक्षदा पाटील पोलीस अधिक्षक लोहमार्ग औरंगाबाद यांनी तपास पथकास १०,०००/-रु. रोख बक्षीस घोषीत केले आहे.
