मुंबई सेंट्रल : दिनांक २९/०८/२०२१रोजी सेवानिवृत्त नारायण सकलाल जाधव. वय – 70 वर्षे राह. कोंगारा,पो. पिंपरी, हे मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस याठिकाणी स्टॉलवर पाणी बाटली खरेदी करून जात असतांना त्यांच्याजवळील फोनडायरी तिथेच विसरून गेले असता त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या फोन डायरी, त्यात आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, विदर्भ ग्रामिण बॅकेचे एटीएम कार्ड व एटीएम पाकीटावर पासवर्ड लिहलेला इत्यादी.तसेच ७००/– रु. रोख ४०,०००/- रुपये पाकीटातील एटीएमचा वापर करुन विड्रॉल. केले याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली त्यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील ट्रान्झेक्शनची माहीती, बॅक ऑफ बडोदा व युनियन बँक ऑफ इंडीया यांचे एटीएम सेटर कोड यांची माहीती प्राप्त करुन सदर एटीएम सेंटर मधिल सी. सी. टि. व्ही. फुटेज प्राप्त करुन विड्रॉल केलेले अनोळखी चोरट्याचे छायाचित्र पोलिसांनी डेव्हलप केले. त्यावरून आरोपी राम किशन यादव. वय – २५ वर्षे, राह. खाऊ गल्ली, झवेरी बाजार, यास दिनांक २६/१०/२०२१ रोजी वरील गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली व तसेच त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार, पोलीस निरीक्षक श्री. नंदकिशोर जाधव. यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. श्री. सुनिल डोके, पो. हवा., एस. एफ. सोनावणे, पो. हवा. एस. व्ही. बने, पो. हवा. दबडे, पो. ना. एस. टी. महाडीक, पो. ना. व्ही. व्ही. जाधव, पो. ना. एम. डी. पाटील, पो. ना. ओ. व्ही. वळवी, पो. ना. डी. एन. पाटील, पो.शि. वाय. एन. बच्चे यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
वसई : सुरेश जानकीलाल सुमन, वय२६वर्ष, राह. जिल्हा कोटा, राज्य राज्यस्थान, हे दि.१३/०८/२०२१ रोजी मरु सागर एक्सप्रेसने प्रवास करीत असताना रात्रीच्या वेळीस त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्याची शोल्डर पर्स त्यात ९४,१९९/- रू किमत असलेले ऐवज त्यात 2 मोबाईल फोन चैन ,ब्रेसलेट व रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन गेला आहे हे गाडी वसई रेल्वे स्टेशन येथुन थांबुन सुटलेली होती त्यावेळी लक्षात आले याबात त्यांनी अजमेर रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली त्यावरून ती तक्रार वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हयाचा समांतर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे API साठे ,PSI शिंदे व स्टाफ,STF सेंट्रल क्राईम युनिट, कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी आदेश बहादुर सिंह वय २४ वर्ष राहणार:- रामपुरा पोस्ट. मध्यप्रदेश यास अटक करुन सदर गुन्हयात चोरीस गेलेला माल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ठाणे :सलीमुद्दीन अलाउद्दीन शेख वय ४९ वर्षे, राह. मुंब्रा, हे दि. १४/१०/२०२१ रोजी मुंब्रा रेल्वे स्टेशन तिकीट काउंटर वर तिकीट काढुन बाकड्यावर बसले असता अज्ञात चोरटयाने त्यांच्या शर्टाचे खिशातील मोबाईल चोरून नेला. सदर गुन्हयाचा तपास वपोनि ठाणे रेल्वे पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे पो.नि.बागुल व PSI सापटे, पो. हवा राठोड , पो.ना.जाधव,पो.ना.जगधने, म.पो ना. गायकवाड , पो.शि. कुलकर्णी, पो.शि. पाटील,पो. शि. तुरकुंडे, पो.शि. पाटील पो.शि.पाटील यांनी दि. २६/१०/२०२१ रोजी ड्युटी वर असताना आरोपी मन्सुर रफिक शेख , वय ३० वर्षे, राह- रे रोड, यांस ब्रिज खाली संशयास्पदरित्या फिरत असताना ताब्यात घेवुन पोलीस ठाणेत हजर करुन पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याचा कडे मोबाईल मिळून आला त्याबद्दल विचारले असता तो मोबाईल त्याने चोरी केला असल्याचे सांगितले .त्यावरून आरोपीस अटक करण्यात आली व सदर चा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
