बोरिवली : प्रशांत वय 27 वर्षे राह. कांदिवली हे दिनांक १/९/२०२१ रोजी दादर पश्चिम रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 01 वर आलेल्या बोरिवली स्लो लोकल ने जात असताना सदर लोकल गोरेगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 03 वर सुरू होताच आरोपी राजदेव दास, वय ३१ वर्षे, याने प्रवाशी प्रशांत याच्या हातातील 13500/- रूपये किंमतीचा रेडमी कंपनी चा मोबाईल जबरदस्तीने खेचून पळून जात असताना त्या वेळी तेथे हजार असणारे पोहवा शेख, हजारे, पोनाशिंगाडे, पोशि. पाटील, चौधरी, सकट, पवार यांनी रंगेहाथ पकडले नमूद आरोपीस अटक करण्यात आली आहे.
मुंबई सेंट्रल : मिनाक्षी मनोहर पांचाळ. वय – २९ वर्षे, राह. ठाणे या दिनांक – २१/८/२०२१रोजी दादर रेल्वे स्टेशन (पश्चिम) येथून प्रवास करत असतांना त्यांच्याजवळील १२,९९० रुपये किं. चा मोबाईल फोन एका चोरट्या इसमाने लबाडीने चोरी केला. अज्ञात चोरट्या विरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटा व चोरीस गेले मोबाईल फोनचे ट्रेसिंग मुदतीत प्राप्त करुन आरोपी विवेक दुराई सिंग. वय – २४ वर्षे, राह. मालाड (पुर्व) याचा शोध घेवुन त्यास अटक करण्यात आली. आरोपी याची सखोल चौकशी केली असता मुळ आरोपी वैभव चंद्रकांत पोद्दार. वय – 20 वर्षे, राह. मालाड (पुर्व), त्यास नमुद गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्यातील चोरीस गेला एकुण ज्ञ १२,९९०/- रु. किं. चा मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. डी. पी. चव्हाण, पो. ना. जी. के.दौंड, पो.ना.एस.एस.साळुखे यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
बांद्रा : सांताक्रूझ रेल्वे स्टेशन वरून ऋतुजा अनिल जायभोडे, वय- २७ वर्षे राह.- मुंबई ह्या दिनांक – ३१/८/२०२१रोजी प्रवास करत असतांना सदरची लोकलगाडी वांद्रे रेल्वे स्टेशन येथून गाडी सुरु होताच एक अनोळखी इसम अचानक गाडीत चढून ऋतुजा यांचे हातातील २७,000/-रु.किं.चा मोबाईल फोन खेचून गाडीतून खाली उतरुन पळून गेला सदर बाबत वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला.त्याअनुषंगाने सदर गुन्ह्याचे सीसीटीव्ही फूटेज तपासून फूटेजमध्ये दिसून आलेल्या आरोपीचे फूटेज पोलीस ठाणे नेमणूकीतील पोना. कुंभार यांनी त्यांचे खास बातमीदार यांना दाखविले असता, फूटेजमधील दिसत असलेला आरोपी हा नवपाडा ब्रिजखाली वांद्रे पुर्व येथे येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने नमूद ठिकाणी गुप्तरित्या सापळा रचून आरोपीस अटक केली. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.डी.आर.अरण्ये, सहा.पो.उपनिरीक्षक श्री.एन.एस.चव्हाण, सहा.पो.उपनिरीक्षक श्री.जे.टी.पावडे, पोहवा. ए.बी.सादीगले, पोना. एन.सी.बिडगर,पोना.पी.पी.कुंभार,पोशि.ए.आर.शेडगे,पोशि.एस.एस.शिंदे, पोशि.टि.एल.जाधव, पोशि. आर.डी.दाभोळकर व इतर पथक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
बांद्रा : रेल्वे पोलीस ठाणे फैजल अली सय्यद, वय-३८ वर्षे, राह.- शाहू नगर, याचेविरुद्ध मा.सत्र न्यायाधीश, सत्र न्यायालय, अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेले होते. त्यानुसार दिनांक – १/९/२०२१ रोजी मा.न्यायालयाचे आदेशाने वरील नमूद अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.चौगुले व सहा.पोलीस निरीक्षक श्री.अरण्ये यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस उपनिरीक्षक श्री. यु.वाय.नवार व पोनाएस.ए.पवार यांनी शाहुनगर पोलीस ठाणे नेमणूकीतील पोशितांबे यांना मदतीस घेवून नमूद आरोपीचे पत्त्यावर जावून शोध घेऊन त्यास नमूद पथकाने ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणून अजामीनपात्र वॉरंटावरुन अटक केली.
