दादर : रेल्वे प्रवाशांचा हरवलेला मोबाईल दिनांक ०४/०९/२०२१ मा.रेल्वे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत तसेच वपोनि श्री चिंचकर यांचे मार्गदर्शनानुसार मपोहवा साप्ते व मपोहवा लांडगे यांनी अंकुश पांडुरंग खरात, वय ३२ वर्षे, राह. नालासोपारा यांना २४,९९९ /- रुपये किमतीचा One Plus कंपनी चा मोबाईल फोन परत केला. अंकुश खरात यांनी त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याने दादर रेल्वे पोलिसांचे खूप आभार मानले.
कुर्ला : १) प्रशांत नारायण पितळे, वय ३९ वर्षे, राह. टिटवाळा. यांचा २३००० /- किंमतीचा मोबाईल २) चिंटू कुमार महेंद्र यादव, वय २५ वर्षे, राह. विठ्ठल वाडी १२८०० /- रूपये किंमतीचा मोबाईल यांचे मोबाईल फोन प्रवासादरम्यान गहाळ झाले होते त्यांचा शोध घेऊन मा.रेल्वे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत खालील नमूद फिर्यादी यांना त्यांचा मुद्देमाल दिनांक ०४/०९/२०२१ रोजी परत केला. त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याने त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे आभार मानले.
पनवेल : गौरव आत्माराम तडस, वय २६ वर्षे, यांचा मोबाईल चोरीस गेला अशी तक्रार रेल्वे गुन्हा शाखा मध्ये केली होती. सदरचा गुन्हयातील आरोपीला अटक करून गुन्हयातील मुद्देमाल किंमत २१,९९९/- सॅमसंग A31 कंपनीचा मोबाईल हस्तगत करून माननीय पोलीस आयुक्त सो., लोहमार्ग मुंबई यांचे आदेशा प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी कटारे यांचे मार्ग दर्शना खाली मुद्देमाल शाखा अंमलदार सपोफौ गुजर, व ठाणे अंमलदार सपोफौ गंगधर यांनी गौरव तडस,यांस फोन द्वारे संपर्क साधून त्यांना नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल योग्य अटीवर व शर्तीवर त्यांच्या ताब्यात दिला.
बदलापूर : दि. ०४/०९/२०२१ रोजी बदलापुर रेल्वे स्टेशन येथे पोशि एस.जी.मसने, पोहवा जे.एन.मोरे हे हजर असताना सुमारे 00. ३८ वा. हेल्पलाईन वाडीबंदर येथून मपोना वैद्य यांनी कॉल करून कळविले की, बदलापूर रेल्वे स्थानक येथे येणाऱ्या बदलापूर लोकल च्या जनरल डब्यात अनिकेत चंद्रकांत नारकर, हे रॅकवर एक पिवळ्या व लाल रंगाची पिशवी विसरले आहेत, तरी सदर गाडी अटेंड करा. त्याप्रमाणे पोशि मसने व पोहवा मोरे यांनी सदर लोकलच्या नमूद अटेंड केला असता सदर पिशवी मिळून आली. त्यानंतर अनिकेत चंद्रकांत नारकर, वय २९ वर्ष, राह. दिवा पूर्व यांना बदलापूर रेल्वे पोलीस चौकीत हजर होऊन मिळून आलेली पिशवी व त्यातील साहित्य दाखविले असता ती पिशवी व त्यातील अंदाजे १५००/- रुपये किंमतीचे साहित्य त्यांचेच असून बरोबर आहे, त्याबाबत काही तक्रार नाही, असे सांगितले त्याप्रमाणे सदर पिशवी खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली आहे. त्यांनी रेल्वे पोलिसांचे खूप खूप आभार मानले आहेत.
