दिनांक १८/०८/२०२१ रोजी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे प्रवाशी नाव : १) श्री. मनिकांत नंदलाल मिश्रा राह. ठाणे,यांचा vivo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 14990 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार नोंदवली होती. तसेच २) रमेश धाको कडाली राह. मुरबाड यांचा Oppo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 19900 रुपये किमतीचा फोन हरवला आहे अशी तक्रार नोंदवली होती. सदर तक्रारीची नोंद तसेच प्रवाशांच्या सामानाचा शोध घेऊन त्यांचा मुद्देमाल बाँड पेपर लिहून घेऊन योग्य अटी व शर्ती वर वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सहा.पो.फौ/कोळी, पो. शि. दामेधर, मपोशी. जाधव यांनी फिर्यादी यांना परत दिला आहे त्याबद्दल त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.
तसेच कल्याण रेल्वे पोलीस ठाणे यांना हेल्पलाईन वरून एका महिला प्रवाशी यांनी आपले सामान रेल्वे च्या महिला डब्यात विसरल्याची तक्रार केली होती . त्यानुसार wpc जोशी यांनी फोनद्वारे पोलीस हवालदार जगताप ,यांना सांगितले असता लगेच wasi सूर्यवंशी ,पोलीस हवालदार जगताप, महिला पोलीस शिपाई राठोड असे लोकल अटेंड करून सदर सामान ताब्यात घेऊन महिला प्रवासी नाव मोनाली तांबे वय पन्नास वर्ष राहणार कल्याण काटेमानिवली मोबाईल नंबर वर फोन करून बदलापूर रेल्वे पोलीस चौकी येथे बोलावून सदरची पांढऱ्या रंगाची पिशवी त्यात रंगाची छत्री तीन डबे प्लास्टिक आतील सामानासह खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
त्याचप्रमाणे कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथे आलेल्या तक्रारी नुसार नाव -सुरेश पी श्रीनिवासन आय्यर वय ४४ वर्ष राहणार बदलापुर.यांचा हरवलेला मुद्देमाल रोख रुपये १२००/- SBI बँकेचे एटीएम कार्ड व डेबिट कार्ड,CBI चे ओळखपत्र. मा.रेल्वे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत त्यांना परत केला याबाबत त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे आभार मानले.
