रेल्वे पोलिसांनी प्रवाशांचा चोरीस गेलेला मुद्देमाल केला परत .

Regional News

ठाणे :   वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने दि २७/१०/२०२१  रोजी १) सलीमुद्दीन अलाउद्दीन शेख रा- मुंब्रा, यांचा रू.२५,०००/- कि. हरवलेला फोन २)अभिषेक कविंद्र सिंग रा- दिवा  यांचा रू.१२,४९०/- कि. मोबाईल पो. नि एन.जी खडकीकर, यांच्या मार्गदर्शना नुसार यांना त्याचा मोबाईल  परत करण्यात आला.  त्यांनी  फोन परत मिळाल्याने  ठाणे रेल्वे पोलीसांचे आभार मानले.

सीएसएमटी : धर्मेश विनोद गाला वय- ३४ वर्ष, रा.चिंचबंदर यांनी आपली सोन्याची चैन चोरीस गेल्याची तक्रार सिएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात  नोंदविली होती सदर बाबत  तपास करून दिनांक २७/१०/२०२१ रोजी गाला यांची चोरीस गेलेली सोन्याची चेन वजन १९.३७० ग्राम वजनाची सुमारे ६०,०००/र किंमतीची चैन परत करण्यात आली . चोरीस गेलेली चैन मिळाल्याने धर्मेश गाला   यांनी  पोलिसांचे खूप खूप आभार मानले आहेत.

दादर :  रेल्वे पोलीस आयुक्त साहेब यांच्या मुदेमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत तसेच वपोनि श्री चिंचकर यांचे मार्गदर्शनानुसार मपोहवा साप्ते यांनी अंजली रामसंजीवन प्रसाद वय २२ वर्ष, राहणार- उल्हासनगर यांना   जप्त केलेला १०,०००/- रुपये किमतीचा, मोबाईल फोन त्यांना दिनांक२७/१०/२०२१ रोजी परत दिला यासाठी दादर रेल्वे पोलिसांचे खूप आभार मानले.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply