वसई : दिनांक १२/११/२०२१ रोजी विरार येथील स्कायवाँक वर चालत असताना सोमनाथ शिवराम मदगे, वय ४५ वर्ष,यांना तीन अज्ञात इसमांनी पकडून मारहाण करून त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल फोन, व ४९१०/रू रोख रक्कम जबरदस्तीने काढून चोरी करून पळून गेले या बाबत त्यांनी अज्ञात व्यक्तिविरूद्ध चोरीची तक्रार दाखल केली . सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लाहीगुडे व स्टाफ यांनी कसोशीने तपास करुन आरोपी कमलेश रजनीकांत शहा, वय- ३२वर्षे, राहुल अंकुश साळुके ,वय -२२ वर्षे, यांस अटक करुन सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हयाची कबूली देऊन गुन्हयातील चोरलेला माल काढून दिला. तसेच सदर आरोपीकडेपोलिसांनी अधीक चौकशी केली असता त्यांनी वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यातील एकूण तीन गुन्हे केल्याचे कबूल करून गुन्हयातील मुद्देमाल ही पोलिसांनी आरोपी कडून हस्तगत केलेला आहे.
बोरीवली : शहादत अली वय १९ वर्षे हे दिनांक १९/११/२०२१ रोजी रात्री बोरीवली रेल्वे स्टेशन लोकलची वाट पाहत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन एका चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करून फरार झाला याची तक्रार त्यांनी बोरीवली रेल्वे पोलीस ठाणे येथे नोंदविली असता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथक सपोनि बाविस्कर, पो हवा/जाधव, पोना / पाटील, पो शि / वाडकर, पोशि शेख यांनी व पो नि श्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करत असताना तात्काळ बातमीदारांकडे संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती मिळवून वरून बोरीवली पश्चिम फुटपाथवर परिसरात नमूद गुन्ह्यातील आरोपी हा मोबाईल विकण्यास येणार असल्याची खबर मिळाली त्या प्रमाणे नमूद पथकाने सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी आकाश पंढरीनाथ इंगळे वय २० वर्ष यास ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत गुन्ह्यातील शहादत अली यांचा सॅमसंग जे मोबाईल मिळाला.बोरीवली रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीस या गुन्ह्यात अटक केली आहे.
अंधेरी : दिनांक ०७/११ / २०२१ रोजी अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे येथे सुभाष चंद्रा बल यांचे अंधेरी रेल्वे स्टेशनवर पाकीट चोरी झाले त्यामध्ये असलेल्या त्यांच्या Indusand Bank and Axis Bank बॅकेच्या Debit Card चा वापर करून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या खात्यातन १९,०००/- रूपये काढुन घेतले. सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करून आरोपी रानू विरेंद्र पांडे वय २७ वर्षे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करून सुभाष चंद्रा बल यांचे पाकीट चोरी करून त्यांच्या नमुद बॅकेच्या डेबीट कार्डचा वापर आरोपी यांच्याकडे असलेल्या ICICI Merchant service कंपनीची POS/swap Machine चा वापर करून पैसे काढुन घेतल्याचे दिसुन आले. सदरची रक्कम फरार आरोपी हैदर शेख याच्या अलाहाबाद बँकेच्या अकांउटमध्ये जमा झाल्याचे समजले त्यावरून आरोपीचा तांत्रिक तपास करून शोध घेवुन त्याच्याकडुन अंदाजे १,३२,७९० /-रूपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली असुन त्यामध्ये ICICI Merchant service dकंपनीची काळया व लाल रंगाची सॅकबॅग व रोख रक्कम २७०० रूपये असा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर आरोपी हे Wi-fi Activate असलेल्या Debit Card / Credit Card चा वापर करूनवर POS/swap Machine च्या सहाय्याने बँक अकाउंट मधुन पैसे काढुन घेत असे. सदरची यशस्वी कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री कैसर खालिद, मा.पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ डॉ.संदीप भाजीभाकरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास अरण्ये (वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे), पोलीस उप निरीक्षक सचिन कांबळे, पो.ह./खान, पो.ह. /देखने, पो.ना./आदमाने,यांनी पार पाडली.
