वसई : दिनांक २५/०८/२०२१ रोजी आशुतोष मदनमोहन चौबे वय ३५ वर्ष राहणार – नालासोपारा पुर्व यांनी वसई रोड रेल्वे स्टेशन येथे कळविले की त्यांचे दोन मोठे मेडिसीनचे बॉक्स किंमत अंदाजे 12000/- रुपये असे सामान विरार रेल्वे स्टेशन येथे जाणारी चर्चगेट लोकल च्या डब्यामध्ये प्रवास करताना विसरला आहे. प्रवासी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार दिवसपाळी ड्युटी वर असणारे पो.हवा नाईक व मपोशी दिघा यांनी वसई रोड रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोन वर आलेली लोक मध्ये जाऊन चेक केले असता सदर डब्यामध्ये वरील बॉक्स मिळून आला. त्यानंतर सदर आशुतोष चौबे यांना वसई रोड रेल्वे स्टेशन पोलिस चौकीत बोलावून खात्री करून सदर बॉक्स त्यांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
कुर्ला : रघुनाथ अर्जुन पिंगुळकर वय ५१ वर्ष रा, गणेश नगर नवी मुंबई ठाणे हे दिनांक २५/०८/२०२१ रोजी रात्री ०८. ०० मुलुंड ते ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यान जनरल डब्यातून दरवाज्यात उभे राहून प्रवास करीत असताना सह प्रवाशाचा धक्का लागून त्यांचा मोबाईल रेल्वे ट्रक मध्ये पडल्याने ते स्वतः मोबाईल शोधण्याकरिता ट्रेकमध्ये जात असताना येथे पोहवा. मुळे व पॉईंट ड्युटी चे रेल्वे पोलिसांनी त्यास हटकले त्यावेळी त्यानी वरील हकीकत सांगितली त्यानंतर त्यांनी नमुद पोलीस अंमलदार यांचेसोबत टॉर्च घेऊन मोबाईल शोधण्याकरिता आले असता बारकाईने गवत व ट्रॅक मध्ये निरीक्षण करून mi, कंपनीचा किंमत १५०००/- रुपये किमतीचा मोबाईल फोन मोबाईल फोन शोधून दिला याबाबत रघुनाथ पिंगुळकर यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
