बांद्रा : दिनांक १९/०८/२०२१ रोजी रमाकांत शुभकरण लढ्ढा, वय-34 वर्षे, धंदा-नोकरी, राह.- अंबावाडी, दहिसर-पू, यांनी आपली निळ्या कलरची सॅकबॅग गाडीत विसरल्याची तक्रार नोंदवली होती त्यावेळी पोहवा एम.पी.दुदुमकर, पोशि वाय.एन.सांगळे हे बांद्रा टर्मीनस रेल्वे स्थानक येथे रात्रपाळी कर्तव्यावर हजर होते. नमूद पोलीस अंमलदार हे कर्तव्यावर हजर असतांना दिनांक – २०/०८/२०२१ रोजी सकाळी 07:45 वा. पाहणी केली असता त्यांना त्या डब्यात सीटवर कॉलमध्ये सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक निळ्या रंगाची सॅकबॅग दिसून आली ती त्यांनी लागलीच ताब्यात घेवन पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलीस ठाण्यात येवन त्यांनी सदरची निळ्या रंगाची सॅकबॅग ठाणे अंमलदार सहा.पो.उपनिरीक्षक श्री.आर.जी.लोकरे यांचे समक्ष हजर केली. त्यांनी लागलीच कॉलर रमाकांत लढ्ढा, यांना फोनद्वारे बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे येथे तात्काळ बोलविण्यात आले त्यावरुन नमूद कॉलर हे पोलीस ठाण्यात हजर झाल्याने सदरची निळ्या रंगाची सॅकबॅग त्यामध्ये 1) 6,850/-रु.रोख, 2) 00.00/-रु.किं.चे इतर कागदपत्रे मालमत्ता यांची त्यांचे समक्ष खातरजमा करुन सदरची सॅकबॅग आतील मालमत्तेसह पोलीस ठाणे कर्तव्यावरील ठाणे अंमलदार सहा.पो.उपनिरीक्षक श्री.आर.जी.लोकरे यांचे उपस्थितीत त्यांना परत करण्यात आली आहे. सदर कॉलर यांनी बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्याचे तसेच कर्तव्यावरील पोहवा एम.पी.दुदुमकर, पोशि वाय.एन.सांगळे यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त केलेले आहे.
मुलंड : दिनांक 20/08/2021 रोजी मुलंड रेल्वे स्टेशन येथे प्रवासी श्री. रघुनाथ दाजी म्हात्रे, वय 57 वर्षे राह. दामू म्हात्रे चाळ ,रोड नं 28, वागळे ठाणे 04 असे मुलुंड स्टेशनवरून CSMT येथे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीची वाट बघत असतांना बसण्याच्या बाकावर ते आपला एक 6500/-रु किंमतीचा सॅमसंग कं J2 मॉडेल असलेला गोल्डन रंगाचा मोबाईल फोन विसरून निघन गेले. त्याचवेळी गस्तीवर असलेले ASI चव्हाण मपोना आव्हाड पोशि रेपाळ वरील मोबाईल फोन मिळाला. सदर मोबाईल फोन चौकीत आणला असता PSI रेकुळगे मॅडम यांच्या समक्ष त्यास संपर्क साधला असता सदरील इसम चौकीत येऊन आपला मोबाईल फोन ओळखून तो त्यांचाच असल्याचे खात्री केली,तरी त्यांना वरील फोन सुस्थितीत त्यांच्या ताब्यात देण्यात आला असून सदरील प्रवासी यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
ठाणे : 1)रेल्वे प्रवासी नामे अश्विनी संग्राम डांगरे वय 33 वय रा ठाणे यांचा हरवलेला फोन किंमत.26000/- रुपये दिनांक २०/०८/२०२१ रोजी निरीक्षक एन.जी खडकीकर, पोलीस निरीक्षक एस एल यादव , पोलीस निरीक्षक ए एस बागुल यांच्या मार्गदर्शना नुसार ASI चौधरी, पोलीस नाईक मदने, यांच्या सक्षम परत करण्यात आला.2) मोहन जयराम लवांडे वय 67, रा कळवा त्यांचा मोबाईल फोन देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.जी खडकीकर, पोलीस निरीक्षक एस एल यादव, पोलीस निरीक्षक ए एस बागुल यांच्या मार्गदर्शना नुसार ASI चौधरी , पोलीस नाईकमदने, यांनी फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
कुर्ला : 1) शहानवाज खान इस्तीकार खान वय ३० वर्ष राहणार मुंब्रा .यांचा हरवलेला रेडमी कंपनीचा रुपये ७९९९/-किंमतीचा फोन परत करण्यात आला.2) विधान वामनराव कांबळे वय ५२ वर्ष राहणार विटावा कळवा यांचा हरवलेला ओप्पो कंपनीचा १७,४९०/-रूपये किंमतीचा मोबाईल फोन परत करण्यात आला.
पनवेल : पल्लवी मोहन चव्हाण/सुर्वे वय ३० वर्षे राह.बेलापूर व सह प्रवासी कुमारी त्रिवेणी सुरेश तुपे वय १८ वर्षे, राह. बेलापूर यांना २५,०००/-विवो कंपनीचा मोबाईल फोन, 2) १५०००/- विवो कंपनीचा मोबाईल फोन असे एकूण ४०,०००/-किमतीचा त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला.
