कर्जत : दिनांक २५/१२/२०२१ रोजी बंडु परमेश्वर झिंझुर्के, वय २७ सिंहगड एक्सप्रेसच्या डी १ डब्याच्या दरवाज्यात बसून प्रवास करीत असताना, सदर गाडी कर्जत रेल्वे स्टेशन येथे आली असताना, एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने हिसकावून पळू लागला, तेव्हा त्यांनी चोर चोर असा आरडाओरड केली असता, तेव्हा कर्तव्यावरील गुन्हे तपास पथकातील पोलिस अमलदार पोशि समिर पठाण, पोशि निकेश तुरडे, पोशि गणेश शेटे यांनी पळुन जात असलेल्या इसमाचा पाठलाग करून, त्यास पकडुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात हजर केले, तेव्हा हजर केलेल्या बापु हनुमंत जाधव, वय ३२ वर्ष, याची अंगझडती घेतली असता, त्याने चोरलेला मोबाईल मिळून आला . नमुद आरोपीच्या अंगझडतीत मिळुन आलेला मोबाईल फोन सदर गुन्ह्यातील असल्याने तो गुन्ह्याचे पुरावे कामी जप्त करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. २) कर्जत लोहमार्ग पोलीस ठाणे(24 तासात गुन्हा उघड केलेबाबत) कर्जत रेल्वे पोलीस ठाणे चोरीस गेलेल्या मोबाईल चा तपास करीत असताना, गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोनचा व आरोपीचा खास खबरी मार्फत शोध घेतला असता, इसम राहुल गौरीशंकर पासवान, राह :- हलीवली, याने चोरी केला असल्याचे माहिती मिळाल्याने, त्याचा गुन्हे तपास पथकातील पोलीस अमलदार पोहवा/पाटील, पोशि /पठाण, पोशि /शेटे यांनी शोध घेऊन पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार कक्षात हजर केले,तेव्हा त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव, वय १५ वर्ष, असे सांगितले, नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल फोन बाबत विचारणा केली असता, त्याच्याकडील मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपीचे वय १५ वर्ष असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कुर्ला : दिनांक २६/१२/२०२१ रोजी घाटकोपर रेल्वे स्टेशन येथे दिवस पाळी ला HC/1161 पवार,पो.ना/पाटील, पो.शि/ नागरगोजे,पो. शि./ देवकते, म.पो.हा/बनसोडे, म.पो.ना/माने, म.पो.ना/ गायकवाड, म.पो. शि/52 फरांदे यांच्या सोबत असताना कंट्रोल वरून पो. शि/नागरगोजे यांना फोन आला की घाटकोपर रेल्वे स्टेशन येथून सीएसटी ला जाणारी फास्ट लोकल मध्ये महिला डब्यात एक एचपी कंपनीची निळ्या रंगाची सैक बॅग आहे हे सांगितले त्या नुसार सदर गाडी अटेंड केली असता बॅग मिळून आल्याने प्रवासी रेवा राकेश दिघे, वय 33 वर्ष यांच्या सांगण्यावरून त्यांच्या पतीला घाटकोपर रेल्वे पोलीस चौकीत बोलावून सदर बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आली यासाठी त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार व्यक्त केले.
