कुर्ला : २१/०८/२०२१ : कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे, येथे रेल्वे प्रवासी यांनी तक्रार नोंदविली होती कि ते दि. १४/०८/२०२१ रोजी दुपारच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्टेशन कसाई वाडा बाजूकडील ब्रीज वरून चालत जात असताना, एका अनोळखी इसमाने अचानक फी. यांचे हातातील 18000/-रु किंमतीचा एक vivo कं चा लाईट ब्लु रंगाचा ज.वा मोबाइल फोन., जबरीने खेचून चोरून पळून गेला. प्रवासी हे दिव्यांग असल्याने तसेच तक्रार कोठे द्यावी याबाबत संभ्रम होऊन उशिरा दि. १८/०८/२०२१ रोजी पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिल्याने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा लिंगाले, पोना. मोहिते, पाटील, यांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळ चे सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार यांचेकडून प्राप्त माहितीनुसार, सदर आरोपी नाव :- अजय अरुण कासारे, वय २८ वर्ष, राह. पी.एल.लोखंडे मार्ग चेंबूर मुंबई., हा लोहमार्ग पोलीस आयुक्तालय चे रेकॉर्ड वरील नसताना, पोउनि मेढे, पोहवा शिंदे, नागवकर, यांचे मदतीने नमूद आरोपीस २४ तासाचे आत गोवंडी झोपडपट्टी परिसरातून अटक करून चोरीस गेला मोबाईल फोन हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.त्यानतंर आरोपीचा पूर्व इतिहास पडतळला असता त्याचे विरुद्ध शहर हद्दीत एकूण ६ गुन्हे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्याचप्रमाणे दि. १८/०८/२०२१रोजी कुर्ला टर्मिनस येथे तिकीट बुकींग हॉल मध्ये ASI खुमकर, PN येवले व PC शेख हे सकाळी ०८.३० चे सुमारास गस्त करीत असताना त्यांना आरोपी अंकित देवदत्त पांडे, वय १९ वर्षे, राह. कुर्ला कमानी., हा संशयित हालचाली करीत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन रिपोर्ट सह पोलिस ठाण्यात हजर केले. त्याचे अंगझडतीत दोन मोबाईल फोन मिळून आले. सदर मोबाईल फोन बाबत PSI दुम्मलवाड, HC शिंदे, पोना.राठोड, पोना पाटील, PC भराडे, खेताडे यांनी तांत्रिक महितीचे आधारे तपास करुन सदर मोबाईल फोन मालकाचा शोध घेऊन नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्याकडे अटक केलेल्या आरोपीकडे १) ५५०००/-रू.कि.एक काळ्या रंगाचा सॅमसंग कं. चा मोबाईल फोन., २) ५०००/-रू किमतींचा सॅमसंग कं. चा मोबाईल फोन., एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बोरिवली : चंद्रकांत काशिनाथ महाले वय-५७ वर्षे, नोकर राह- गोराई, बोरिवली पाश्चिम, मुंबई हे अंधेरी येथून कामावरून बोरवली येथे विरार फास्ट लोकल ने येत असताना दिनांक १९/०८/२०२१ रोजी लोकल बोरवली फलाट क्रमांक 3 वर आली असता महाले हे लोकलमधून उतरत असतांना आरोपी नाव -शाहबाज बाबू खान , वय- 30 वर्षे, राह- वसई फूटपाथवर, वसई पूर्व, जिल्हा पालघर याने महाले यांना पाठीमागून धक्का मारून त्यांच्या खिशातील पाकीट त्यात रोख रक्कम ९२० /- रू. फिर्यादी यांचे आधार कार्ड व वित्त विभागाचे ओळखपत्र जबरीने चोरी करून पळून जात असताना त्यास गस्तीवरील पोलीस पोलीस पथकाने रंगेहात पकडले. सदर बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
