रेल्वेच्या गर्दीत घुसून प्रवाशांचे मोबाईल व पर्स चोरणाऱ्या चोरांना रेल्वे पोलिसांनी केली अटक.

Crime News

कल्याण :  रेल्वे हद्दीत गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार तसेच मोबाईल चोर हे अंत्यत चालाखीने प्रवाशांचे मोबाईल तसेच पर्स जबरदस्तीने चोरून गर्दीचा फायदा घेऊन पळून जातात असाच प्रकार कल्याण रेल्वे हद्दीत घडला असून त्याची गंभीर पणे दखल घेऊन सदर गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण युनिट, गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई येथील सहा.पो.निरी. शेख व स्टाफ वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करत असताना आरोपी 1) केतन सुर्यकांत पवार उर्फ वडा, वय २३ वर्षे, राह. सुभाषवाडी झोपडपट्टी, अंबरनाथ (प), जि. ठाणे, 2) दिपक गणेश गायकवाड, वय ४२ वर्षे, राह. भाटवाडी झोपडपट्टी,  अंबरनाथ (प), जि. ठाणे. यांना दि. २२/०८/२०२१ रोजी बातमीदाराने दिलेल्या बातमी वरुन त्याना कल्याण रेल्वे पो.ठाणे अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीची कसुन चौकशी केली असता त्यांनी असे एकुण ५२८६०/- रूपये किंमतीचे एकुण 04 मोबाईल फोन  चोरी केल्याचे आपले गुन्हे कबूल केले असून त्याच्याकडील सर्व मुद्देमाल पोलिसांना हस्तगत केला आहे तसेच ज्या प्रवाशांचे मोबाईल होते त्यांना सुपूर्द केले.

सदरची कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गजेंद्र पाटील, गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. ए.सी. शेख यांचे अधिपत्याखालील पोहवा. दिवटे, पोहवा. पुलेकर, पोहवा. भोजने, पोना. कर्डिले,  पोना  तावडे, पोशि  सुरवसे, मपोशी. पाटील यांनी केलेली आहे.

दादर :  दिनांक २४/०८/२०२१रोजी पश्चिम परिमंडळातील निर्भया पथका मधील मपोहवा  सुर्वे, मपोहवा  गावीत, मपोना  सुरवाडे दादर फलाट क्र. ३ वर गर्दिच्या ठिकाणी गस्त करत असताना सुमारे ०८. ५० च्या दरम्यान पर्व राजीव जैन, वय ३४ वर्षे राह. डोंबिवली (पूर्व) हे  आलेल्या बोरीवली फास्ट या ट्रेन च्या डब्यात चढताना राज विजयप्रताप चव्हाण वय १७ वर्षे राह. सांताक्रुझ (पूर्व) याने फिर्यादी यांच्या पाठीमागे अडकलेल्या सॅकबॅगची चैन खोलून त्यामधील पाकीट चोरुन गाडीतून उतरून लगबगीने जात असताना निर्भया पथकातील महिलांनी त्यास रंगेहाथ पकडले. त्याचे अंग झडती मध्ये (1) ३०० रुपये रंगाचे ब्राऊन रंगाचे लेदरचे पाकीट, (2) ७१० रुपये रोख रुपये इतर कागदपत्र असे एकूण :- १०१० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व सदर मुद्देमाल जैन यांना परत करण्यात आला आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply