दारशेत- उंबरपाडा जवळील मंगलडोहा रेतीबंदरात ता. जि. पालघर, येथे आरोपी पिंकेश विश्वनाथ तरे (वय-३६) राहायला. वसई ता. पालघर यांनी वाळू/ रेतीचे उत्खनन व वाहतूक नियमावली केलेली असताना, सदर भागात असलेल्या नदी किनारी किंवा खाडी किनारी रेती उत्खनन केली. शासनाची परवानगी नसताना देखील दारशेत- उंबरपाडा जवळील मंगलडोहा रेती बंदरात अवैद्यरित्या रेती भरून वाहतूक करताना सफाळा पोलीसांना मिळून आले. सदरची घटना दि. ०५/०१/२०२१ रोजी ४:३० च्या दरम्यान घडली.
सफाळा पोलीसांनी आरोपी पिंकेश तरे याच्या ताब्यातून तब्ब्ल १) १५,००,०००/- रुपये किमतीचा हायवे मो.ट्रक २) ४८,०००/- रुपये किमतीची आयवा मो.ट्रक आणि त्यामधील एकूण ०४ ब्रास रेती ३) १८,००,०००/- रुपये किमतीचा जेसीबी ४) १८,००,०००/- रुपये किमतीचा आणखीन एक जेसीबी ट्रक असा एकूण ५१,४८,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक. ०५/०१/२०२१ रोजी आरोपी पिंकेश तरे याला अटक करण्यात आली असून “सफाळा पोलीस ठाणे” गु. रजि क्र. ०१/२०२१ भा द वि स कलम ३७९,३४ महाराष्ट्र जमीन महसूल कायदा सन १९६६ चे कलम ४८(७) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास चालू आहे .
सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक श्री. संदीप कहाळे, प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.
