पेल्हार: दिनांक :- ०१/०६/२०२२ दुचाकी वाहने व रिक्षा चोरी करणा-या सराईत आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश. पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दि.२१/०५/२०२२ रोजी ते दि. २२/०५/२०२२ रोजी कमलाकर चाळ, शनिमंदिराचे मागे, तुंगारेश्वर मंदिर रोड, तुंगार फाटा, वसई (पु.), ता. वसई, जि. पालघर येथे अनुपम रामदुलार यादव, वय-३५ वर्षे, रा. शनि मंदिराचे मागे, तुंगारफाटा, वसई(पु.), यानी त्यांची होंडा ऍक्टिवा मोटर सायकल उभी करुन ठेवलेली असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन चोरुन नेले बाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता .
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाख्नेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवून व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपी १) रोहितकुमार गौड, वय-२१ वर्षे, २) विनयकुमार पटेल, वय-१९ वर्षे, ३) सौरभ यादव, वय-२२ वर्षे, ४) रितेश जंजाळे, वय-१९ वर्षे, सर्व रा.वसई (पु.), यांना दि.३०/०५/२०२२ रोजी अटक करुन त्यांचेकडून एक ऑटो रिक्षा, ०७ मोटार सायकल असा एकुण- २,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींवर याअगोदर ७ गुन्हे नोंद असून या सर्व गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाधुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. अमर मराठे, पोलीस निरीक्षक (प्रशासन), व पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि/सनिल पाटील, पोहवा/योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, पोना/प्रताप पाचुंदे, पोअं/संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
