कळवा : रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अशा गुन्हयावर प्रतिबंध व्हावा तसेच दाखल गुन्हे तात्काळ उघडकीस यावे याबाबत आदेश दिलेले होते. त्या अनुशंगाने कळवा पोलीस ठाणे येथिल वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड व डि.बी पथकातील अधिकारी तसेच अंमलदार यांनी आराखडा तयार करून सदर गुन्हयामधील आरोपींचा शोध घेण्याची मोहीम चालु केली होती गुन्हा घडलेल्या घटनास्थळाच्या परिस्थतीजन्य पुरावा तसेच गोपनिय बातमीदारांच्या मार्फतीने शोध घेतला असता कळवा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पो.हवा एडके यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त झाली की कळवा परिसरामध्ये रिक्षा चोरी करणारा एक इसम कळवा रेल्वे स्टेशन परिसरात येणार आहे. बातमीदाराने दिलेल्या माहीती व वर्णनानुसार दिनांक ०५/०९/२०२१ रोजी पहाटे २.०० वाजताच्या सुमारास कळवा रेल्वे स्टेशन येथे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन बातमीदाराने दिलेल्या वर्णनाचा इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अजय विलास आव्हाड, वय- १९ वर्षे, राह काळाराम मंदीर रोड, पंचवटी, पुणे विदयार्थी गृह, नाशिक असे सांगितले त्याच्याकडे कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्याने विटावा कळवा परिसरातून रिक्षा चोरी केलेबाबत प्राथमिक माहीती दिली. त्यानुसार त्यास कळवा पोलीस ठाणे येथे गुन्हयात दिनांक ०५/०९/२०२१ रोजी ०५.१९ वा अटक करण्यात आली त्यानंतर त्याच्याकडे रिक्षा चोरीच्या गुन्हयांबाबत सखोल चौकशी केली असता त्याने रिक्षा चोरीचे एकुण ७ गुन्हे केल्याचे निष्पण झाले असुन त्याने दिलेल्या निवेदनानुसार गन्हयातील एकूण ७ चोरीस गेलेल्या रिक्षा (त्यांची एकुण किंमत ८,२०,०००/-रूपये ) जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी ही मा, श्री जगजीत सिंग, पोलीस आयुक्त, ठाणे शहर मा. श्री सुरेशकुमार मकला सह। पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा अपर पोलीस आयुक्त, मा. श्री अनिल कंभारे पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर, मा. श्री अविनाश अंबुरे ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, ठाणे शहर, मा.श्री डॉ विनयकुमार राठोड पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ ठाणे शहर, मा. श्री व्यंकट आंधळे ,सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाणेचे श्री मनोहर आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री सुदेश आजगांवकर पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री भारत चौधरी पोलीस निरीक्षक, श्री योगेश आव्हाड पोलीस निरीक्षक, निलेश कानडे सदा पानी निरीक्षक महेश कवळे पोलीस उप निरीक्षक, सहा.पो.उप निरी. महाजन, पोह. एडके, पोह. दराङे, पोह. शिंदे, पोह.चव्हाण, पोह. रामराजे, पोना. महाडीक, पोना.काले पोशि. ढावरे, पोशि. ढेबे, पोशि. साठे, पोशि. महाजन, पोशि. तडवी पोशि. केकाण यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे हे करीत आहेत.
