भाईंदर : नवघर पोलीस ठाणे हद्दीत मागील सहा महीन्यांपासुन वारंवार रिक्षा चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस पथकास वरिष्ठांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्याच वेळी दिनांक ०६/०८/२०२२ रोजी पृथ्वीपाल रामसुख यादव यांनी त्यांची रिक्षा चोरी झाल्याबाबत नवघर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र मेहनत घेवून मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीवरुन भाईंदर-पुर्व, मालवणी, गोवंडी, शिवाजीनगर,मुंबई तसेच वाई, सातारा येथुन आरोपी १) राम शिवराम कुमार, वय २२ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक रा. पटेल वाडी, चिकुवाडी, मालाड पुर्व मुंबई २) सुरेंद्र ग्यापुरी गोस्वामी, वय २६ वर्षे, व्यवसाय-रिक्षाचालक, रा. शंकर मंदिराचे मागे, मालवणी गाव, मालाड पश्चिम मुंबई ३) रुशीदेव ठाकुरप्रसाद शुक्ला, वय ५४ वर्षे, व्यवसाय रिक्षाचालक राकाशिगाव, विमल डेअरी रोड, भाईंदर पुर्व ता.जि.ठाणे ४) अक्साम अकरम खान, वय ४२ वर्षे, व्यवसाय- रिक्षा चालक रा मोमीनपुरा चाळ, नारायणनगर, घाटकोपर (प.) मुंबई ५) इरसाद अहमद रफातुल्ला खान, वय ४६ वर्षे, व्यवसाय गॅरेज चालविणे, रा. नारायण नगर, घाटकोपर (पश्चिम) मुंबई ६) मोहम्मद झाकीर फकीर मोहम्मद सय्यद, वय ४२ वर्षे, व्यवसाय स्नप रा. प्लॉट नंबर १७, रोड नंबर ०३, शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई ७) विजय उत्तम वाघ ऊर्फ घाटी वय ४७ वर्षे, धंदा-रिक्षा चालक रा-मुळ गाव-कळंबे, ता. वाई, जि. सातारा, पोलीस ठाणेभुईंज यांना ताब्यात घेवून त्यांचा वरील गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने गुन्हयात अटक केली आहे. सदर गुन्हयातील ऑटोरिक्षा चोरी करणारे, चोरीचा मद्देमाल विकत घेणारे व बनावट नंबर प्लेट करणा-या सर्व आरोपींची भुमिका निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयास तपासादरम्यान वाढीव कलम लावण्यात आले आहे. नमूद सर्व आरोपी हे सध्या पोलीस कोठडीमध्ये असून गुन्हयाचा पुढील तपास नवघर पोलीस ठाणेचे स.पो.नि.योगेश काळे हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील अटक आरोपीतांकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडुन मालवणी, गोवंडी, शिवाजीनगर, मुंबई व सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहुन ७,१०,०००/- किंमतीच्या एकुण १३ ऑटो रिक्षा हस्तगत करुन नवघर पोलीस ठाणे, काशिमिरा पोलीस ठाणे, वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई, एम.एच.बी. पोलीस ठाणे, मुंबई येथील रिक्षाचोरीचे एकुण ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१, श्री. शशिकांत भोसले, सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, सुशीलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. योगेश काळे, पो.उ.नि. अभिजित लांडे, पो.हवा./भुषण पाटील, पो.ना. गणेश जावळे, पो.शि. सुरेश चव्हाण, ओंकार यादव. सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव, नवनाथ घुगे यांनी केलेली आहे.
