वालीव : दिनांक – २२/०३/२०२२ रोजी रात्री च्या सुमारास रिक्षा चालक हे मालाड येथे प्रवाशांची वाट पाहत असताना प्रवासी म्हणून बसलेल्या तीन व्यक्तींनी अंधाराचा फायदा घेऊन रिक्षा कामण रेल्वे स्टेशनकडे येत असताना आरोपी यांनी कामण जैन मंदीर जवळ गाडी थांबविण्यास सांगुन तीन व्यक्तींनी रिक्षा चालकास ठोशाबुक्याने मारहाण करुन रिक्षाची काच फोडुन रिक्षा चालकाच्या शर्टच्या खिशातील रोख रक्कम व पाकीट जबरदस्तीने काढुन घेवुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर बाबत रिक्षा चालकाने यांनी वालीव पोलीस ठाणे येथे खबर दिल्याने ०३ अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयातील अनोळखी आरोपी यांचा बातमीदार तसेच तांत्रिक माहीतीचे आधारे वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने शोध घेऊन आरोपी १) जुनैद अहमद इकलाख अहमद खान २) रिझवान नसीबअली शहा ३) नासीर हुसेन जाकीर हुसेन शेख तिन्ही रा. टि. डोंगरीपाडा, नायगांव पुर्व यांना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस करण्यात आला आहे.अटक आरोपी यांची अधिक चौकशी केली असता आरोपी जुनैद खान व रिझवान नसीबअली शहा यांनी दिनांक – २३/०१/२०२२ रोजी पवई मुंबई येथुन प्रवासी रिक्षामध्ये बसुन राष्ट्रीय महामार्गावर सातीवली खिंडीत लघुशंकेचा बहाणा करुन रिक्षा चालकास मारहाण करुन त्याची रिक्षा, रोख रक्कम व मोबाईल जबरीने चोरी करुन पळुन गेले होते. सदर घटने बाबत वालीव पोलीस ठाणे गुन्हा नोंद असुन सदर गुन्हा आरोपी यांनी केल्याचे कबुल केले असुन आरोपीत यांच्या कडुन एक रिक्षा व एक पॉकीट असा एकूण ५०,०००/- रुपये किंमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्री. पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, पोना.सचिन दोरकर, राजेंद्र फड, भालचंद्र बागुल, पो.अंम.गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
