मिरारोड दि. २७/४/२०२२ रोजी मिरारोड पोलिसांनी गुटख्याची अवैध रित्या वाहतुक करणाऱ्या रिक्षाचालकास रंगेहाथ अटक केली असुन एकुण १,८९,३६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक २७/४/२०२२ रोजी मिरारोड पोलीसांना गोपनिय माहिती मिळाली की, मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन एका रिक्षा मधुन प्रतिबंधित गुटखा, पान मसाला विक्रीकरीता घेऊन जाणार आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन कोतमिरे व पोलीस अंमलदार अशांनी आर. बी. के. स्कुल येथे खाजगी वाहनाने रवाना होऊन तेथे सापळा लावला असता रात्रीच्या सुमारास बातमीप्रमाणे रिक्षाचालक हा सदरची रिक्षा तेथे घेऊन आल्यावर पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न कला असता आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानां त्यास अडवून रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये ६१५६०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच रोख रक्कम २२,८००/- रुपये तसेचे गुन्हयात वापरलेली १,०५०००/- रुपये किंमतीची ऑटोरिक्षा पोलिसांनी जप्त केला आरोपी कडून एकुण १,८९,३६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाईबाबत मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी १. रामचंद्र जगमोहन चौरसिया व २. धनराज रामनारायण मौर्या यांना अटक अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विजयसिंह बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिरारोड पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री. सचिन कोतमिरे, पोलीस हवालदार श्री. राहुल गावडे यांनी केली आहे.
