वालीव : रिक्षामध्ये प्रवासी म्हणुन बसून रिक्षा चालकांसच लुबाडण्यात आले हि घटना वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवेवर झाली . दिनांक २३/०८/२०२१ रोजी रिक्षा चालक याला दोन इसमांनी मिरा रोड ते वसई जाण्यासाठी रिक्षा पकडली व रिक्षा मुंबई अहमदाबाद हायवे वरुन चिंचोटी ब्रिजच्या पुढे आले असता सदर दोन इसमांनी रिक्षा चालकावर छातीवर ब्लेड मारुन किरकोळ दुखापत करुन जबरदस्तीने पॅन्टच्या खिश्यातुन मोबाईल व पैसे घेवून पळुन गेले. याबाबत त्याने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती .
याप्रकारचे हायवेवर दुखापत करुन जबरदस्तीने चोरी करण्याचे प्रमाण वाढत असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त व प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे वालीव गुन्हेप्रकटिकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळावरील बारकावे, तांत्रिक विश्लेषण, सि.सि.टी.व्ही फुटेज या अनुषंगाने तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याआधारे तपास करून पोलिसांनी आरोपी १) शेर-ए-रजॉ साजीद खान पठाण, वय – २३ वर्षे २) राहील साजीद खान पठाण, वय : २० वर्षे रा. रामवाडी,गुजरात यांना अटक करण्यात आली व आरोपी यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी याप्रकारचे ०२ गुन्हे केल्याचे कबूल केले असून १३,०००/-पये किंमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ वसई, श्री. पंकज शिरसाट सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कैलास बर्वे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे, श्री. राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटिकरण शाख्नेचे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.उप.निरी. प्रशांत चव्हाण, पो.हवा. मुकेश पवार, मनोज मोरे, योगेश देशमुख, पो.ना. किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतिष गांगुर्डे, राजेंद्र फड, पो.अंम. गजानन गरीबे यांनी केली आहे.
