वालीव : सातीवली ब्रिज ते पुढे ८०० मीटर अंतरावर मुंबई अहमदाबाद हायवे रोड वसई पुर्व याठिकाणी दिनांक २३/११/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता ते दिनांक १४/१२/२०२१ रोजी १०.०० वा. रोजी सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन उभारलेल्या सि. सि. टि. व्ही. कॅमे-याची वायर व इतर साहीत्य असे एकुण १,४०,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमाल चोरी झाल्याबाबत अज्ञात चोरटया विरुध्द वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने घटनास्थळावरुन मिळालेल्या तांत्रीक गोष्टींचा अभ्यास करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी गुन्हयांचा तपास करुन गुन्हयात आरोपी नितीन लाडक्या बोंबाडे वय – २३ वर्षे, रा. मु.पो – घोल, ता. डहाणु, जि. पालघर यास दि. २०/१२/२०२१ रोजी अटक करुन वालीव गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी यास विश्वासात घेवुन कौशल्याने तपास केला असता आरोपी कडुन १,४०,०००/- रुपये किंमीतीचा गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्री. पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि./ज्ञानेश फडतरे, पो.हवा./मनोज मोरे, मुकेश पवार, पो.ना./किरण म्हात्रे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पोअंम/ गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, सचीन खताल, जयवंत खंडवी यांनी केलेली आहे.
