वालीव : रात्रीचा फायदा घेऊन कंपनीमधील अल्युमिनियम ची चोरी करणाऱ्या तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्या आरोपींना वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले . दिनांक १०/०४/२०२२ रोजी रात्री च्या वेळी हर्षिद पॉलीमर डिस्ट्रीब्युटर या कंपनीचे लॉक तोडून त्यातील अल्युमिनियमचे ०६,४०,८००/रुपये किंमतीचे सर्कल चोरी झाले होते त्याबाबत अज्ञात आरोपींविरुध्द वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंलमदार यांनी घटनास्थळास भेट देवून घटनास्थळावरील पुरावे तसेच गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे तपास करुन कंपनीत चोरी करणारे आरोपी १) रामलाल उर्फ शशी देवनाथ राजभर २) अन्वरअली मोहम्मद ईस्माईल शेख ३) अनिस मुस्तकीन शहा ४) सलमान उर्फ मोहम्मद अस्लम मोहम्मद अली खान सर्व रा.कामण, वसई पुर्व व चोरीचा माल विकत घेणारे ५) ईशादअली जिमकंद खान ६) भावेश शंकरलाल शर्मा दोन्ही रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई यांना दिनांक १४/०४/२०२२ वालीव पोलिसांनी अटक केली असुन आरोपी कडून गुन्हयातील ०६,४०,८००/- रुपये किंमतीचा माल व गुन्हयात वापरण्यात आलेले ३,००,०००/- रु.किं. पिकअप टेम्पो असा एकुण ९,४०,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अश्या प्रकारे वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेने यशस्वी पणे गुन्ह्यांची उकल केली .
वरील कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्री. पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोहवा/मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, पोना. सचिन दोरकर, सतिष गांगुर्डे, पो.अंम. गजानन गरीबे, सुर्यकांत मुंढे, सचिन खताळ, जयवंत खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
