वालीव : रस्त्यावरील पादचा-यांना दुखापत करुन त्यांच्याकडी वस्तु चोरी करण्याचे वाढते प्रमाण बघून वालीव पोलीस ठाण्याचे मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदरील घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त व प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस स्टेशन यांनी वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळावरील बारकावे व तांत्रिक विश्लेषण दृष्टीकोनातून तपास करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.त्याचदरम्यान दिनांक २२/११/२०२१ रोजी पियुष मोरेश्वर दळवी हे रात्रीच्या वेळेस गोखिवरे गावातील भाटपाडा येथील गणपती मंदिराच्या लगत रात्रीचे जेवण आटपुन चालत असतांना चार अनोळखी ईसमांनी दळवी यांच्या हातातील आय फोन जबरदस्तीने खेचून नेत होता त्यावेळी त्यांनी प्रतिकार केला असता चोरांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविली त्यावरून अज्ञात चोरानं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी गुप्त बतामीदार तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशईतांचा शोध घेऊन वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी १) विरेंद्रकूमार लखन पासवान वय : २४ वर्षे रा. वसई पूर्व २) आर्या मिथिलेश राज वय २३ वर्षे रा. वसई पूर्व आणि ३) अविनाश मिकी गूप्ता रा. गोखिवरे वसई पूर्व यांना अटक केली आहे तसेच आरोपी कडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-2 वसई, श्री. पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, पोहवा. मुकेश पवार, मनोज मोरे, पो.ना. सचिन दोरकर, राजेंद्र फड, पो. अंम. गजानन गरीबे. सुर्यकांत मुंढे, जयवंत खंडवी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
