भाईंदर: उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पोलुस दक्षता पथकातील पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई आणि एम.आय.डी.सी व्हळुज पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार रामदास गाडेकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचा कार्यभार सांभाळताना देसाई यांनी शेअर मार्केटमध्ये केतन पारेखने केलेला दोनशे कोटींचा घोटाळा उघडकीस आणला होता. अतिरेकी कसाबला सोडवण्यासाठी मुंबई विमानतळावर विमान उडवण्याची धमकी दिली होती. ही धमकी देणा-या आरोपीला गुजरात सुरत मधून त्यांनी अटक केली होती. त्याला सेफ्टी ऑफ सिव्हिलेशन एक्टखाली शिक्षा झाली आहे. ही देशातील पहिली शिक्षा आहे त्यांना आतापर्यंत तिनशे पुरस्काराने सन्मानित केले आहे.
गाडेकर १९९० साली पोलीस शिपाई पदावर भरती झाले होते. त्यांनी १५ घरफोड्या, ५ मंगळसूत्र चोरीचे गुन्हे, नकली नोटांच्या प्रकरणात उत्कृष्ट तपास केला आहे. त्यांना प्रर्शसा पत्रे,२८७ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
