दिनांक २३/०८/२०२१ रोजी कर्नाटक येथे ज्वेलर्स दुकानात दरोडेखोरांनी बंदुखीचा धाख दाखवुन एकास ठार मारुन साधारण ०३ किलो सोने चोरी करुन फरार झाले याबाबत म्हैसूर सिटी, विदयारण्यपुरम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेवून म्हैसूर, कर्नाटक प्रशासनाने आरोपी बाबत माहिती देणा-यास ५ लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केलेले होते. दिनांक २६/०८/२०२१ रोजी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी म्हैसूर सिटी, विदयारण्यपुरम पोलीस ठाणेचे तपास पथक यांनी वालीव पोलीस ठाण्यात येवुन पोलीस मदत मागितली असता वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही करून विदयारण्यपुरम तपास पथकाकडील माहितीच्या द्वारे आरोपी बाबत माहिती काढण्यास सुरवात केली. तांत्रिक माहिती व गुप्तबातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता तो आचोळे लास्ट स्टॉप, नालासोपरा पुर्व येथील विना डायनास्टीक या अपार्टमेन्ट मध्ये गेले ५ ते ६ दिवसापासुन लपुन बसल्याचे माहिती मिळाली.
माहिती प्रमाणे शोध घेतला असता आरोपी १) जहांगीर अब्दुल माणीक शेख रा. कलकत्ता व २) तौफिक शेख रा. कोलार, बैगलोर, कर्नाटक हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता जहांगीर अब्दुल माणीक शेख याने गुन्हयाची कबुली देवुन इतर ०४ आरोपी जम्मु कश्मिर, पश्चिम बंगाल, राजस्थान येथे पळुन गेल्याचे सांगितले. आरोपी क्र. ०२ तौफिक शेख हा सर्व गुन्हयाचा मुख्य सुत्रधार व फायनान्सर असुन तो गुन्हा घडल्यानंतर आरोपींना स्वत:ची ओळख लपवुन परराज्यात पळवून लावण्यास मदत करतो. ज्वेलर्स दुकानातुन चोरी केलेल्या मालापैकी १९,००,०००/- रुपये किंमतीचे ३८० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना म्हैसूर सिटी गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आले असुन त्यांना मा. वसई कोर्टात हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ विरार, श्री. अमोल मांडवे सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोनि. श्री. राहुलकुमार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. ज्ञानेश फडतरे, पो.हवा. मनोज मोरे, मुकेश पवार, योगेश देशमुख, पो.ना. सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, अनिल सोनवणे, पोअंम. सचिन बळीद, गजानन गरिबे, बालाजी गायकवाड, पो.ना. योगेश देवरे, तुळींज पोलीस स्टेशन यांनी केली आहे.
