दहिसर चेक नाका येथे एक महिला रिक्षा मधून प्रवास करीत असताना तिच्या हातातला मोबाईल हिसकावून एक इसम पळून गेला. त्यावरून महिलेने आरडाओरडा केल्याने सदर ठिकाणी कर्तव्यावर असलेले मिरारोड परिमंडळ वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार/७५९ कापडणीस, पोलीस शिपाई/४८५ गुजर यांनी प्रसंगावधान राखून हजर असलेले नागरिक मेहुल थक्कर यांच्या मदतीने आरोपीचा पाठलाग केला.
आरोपीला मोबाईलसह ताब्यात घेऊन काशिमीरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची घटना दिनांक.१७/०१/२०२१ रोजी सायंकाळच्या वेळीस घडली.
आरोपी विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्या मध्ये गु.र.नं ५०/२०२१ भा.द.वी. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा पुढील तपास काशिमीरा पोलीस करीत आहे
