दादर : १) दि ०६/०४/२०२१ रोजी अज्ञात इसमाविरुद्ध कल्याण रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्ह्याचा मा पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या आदेशावर तपास करीत असतांना CCTV फुटेज व खास बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी धर्मा शंकर राठोड, वय २६ वर्षे, राह. बदलापूर यास दि. २६/०९/२०२१ रोजी बदलापूर रेल्वे स्थानकात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले व सदर गुन्हा त्याने केला आहे हे पोलीस तपासादरम्यान कबूल केले असून पुढील तपासासाठी त्यास कल्याण रेल्वे पोलीस ठाणे यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदरची कारवाई श्री गजेंद्र पाटील, वपोनि, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस उप निरीक्षक श्री जहागिरदार आणि पथकाने केली आहे.
२) सरफराज तालीबहहुसेन शेख वय ३१ वर्षे दिनांक २७/०९/२०२१ रोजी कल्याण लोकल पकडत असताना तीफ मोहमद आजीझ सय्यद वय २२ वर्षे याने शेख यांचे खिश्यातील १५,०००/- रु. कि मोबाईल चोरी करून पळून जात असताना फलाटावरील निर्भया पथकाचे महिला पोलीसांनी त्यास रंगेहाथ पकडून व त्यास पोलीस ठाण्यात आणण्यात आले . सदर गुन्ह्यांसाठी आरोपी विरुद्ध दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : गेले काही महिन्यापासून सुरत, गुजरात, राजस्थान येथुन वसई भिवडी व कल्याण मार्ग पुणे, मडगाव अश्या लांब पल्ल्याच्या गद्यामध्ये गाडयामध्ये महिलांच्या पर्स चोरी जाण्याचा गुन्ह्यामध्ये वाढ झालेली बघून मा. कैसर खलिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ यांनी आपल्या पोलीस पथकास याचा छडा लावून गुन्हेगारांस पकडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे एक संशईत इसम हा नालासोपारा रेल्वे स्टेशन याठिकाणी येणार असल्याचे सदर पथकास माहिती मिळाल्याने त्याठिकाणी सापळा लावून आरोपी महमंद नौशाद महमंद आयाज खान, वय २३ वर्षे, राह. धानीवबाग तलाव, नालासोपारा यास ताब्यात घेवून गुन्हेशाखा, विशेष कृती दल, भायखळा कार्यालयात नेण्यात आले व त्याची चौकशी केली असताना त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. त्याने आतापर्यत ०८ गुन्हे उघड झाले आहेत. सदर आरोपीकडून एकूण २,९३,४९९/- रु. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा. श्री. कैसर खलिद, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई यांचे आदेशाप्रमाणे गुन्हेशाखा, लोहमार्ग मुंबई चे श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि, हेमराज साठे, पोउपनिरी. श्री. दिपक शिंदे, सहापोउपनि, महेश कदम, पोहवा / दरेकर, पोहवा / प्रविण घार्गे, महिला पोहवा/मयेकर, पोना/ मिलिद पाटील, पोना. जयेश थोरात, पोना. दिघे, पोना/सतीष फडके, पोना/गणेश महागावकर, पोशि/अक्षय चव्हाण यांनी केली आहे.
वडाळा : दिनांक २३/०९/२०२१ रोजी मलजितसिंग करमसिंग गिल, वय-४७ हे कुर्ला रेल्वे स्टेशन हार्बर लाईन येथे लोकलने प्रवास करीत असतांना असतांना त्यांना फोन आल्याने त्यांनी मोबाईल फोन हातामध्ये घेतला त्याच वेळी सदरची लोकलगाडी सुरु होताच अज्ञात इसमाने येवून त्यांचा फोन जबरदस्तीने खेचून गाडीतून उडी मारून पळून गेला. याबाबत डाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .सदर गुन्हयाचा समांतर तपास श्री. गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली वडाळा युनिट यांनी केला असता सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपी एहकाम खान मोहम्मद आजम शेख, वय २१ यांस अटक करून चोरलेला २३,०००/- किंमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.
