पालघर येथील आर.टी.ओ. चेकपोस्ट दापचरी येथे दिनांक. ०९/१/२०२१ रोजी ०४:०० वाजताच्या दरम्यान चार इस्मान अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असताना तलासरी पोलीसांना आढळून आले.
आरोपी नामे १)शामशाद अहमद अब्दुल हनान (वय३७) राहायला वाटी, राज्य गुजरात २) राजू ३) इब्राहिम शेख ४) निपुल
आरोपी शामशाद अब्दुल हनान याने त्याच्या मालकीची टाटा टेम्पो ह्या वाहनामध्ये आरोपी राजू, इब्राहिम शेख, निपुल ह्यांना घेऊन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य अन्नपदार्थ त्यात विमल मसाला व्हि-१ तंबाखूचा माल वाहतूक करताना पोलीसांना आढळून आले.
आरोपींच्या ताब्यातून तब्बल १)१,२०,००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पान मसाला एकूण ०५ खाकी रंगाच्या गोण्या, एका गोणीमध्ये ४ सफेद रंगाच्या गोणी, एका सफेद रंगाच्या गोणी जांभळ्या रंगाचे ५०पॅकेट २)५,६१,००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पान मसाला एकूण १५ खाकी रंगाच्या गोळ्या एका गोणी मध्ये ४ लहान गोण्या, एका लहान गोणीत लाल रंगाचे ५०पॅकेट, ३)६,५३,४००/- रुपये किमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला विमल पान मसाला एकूण १५ खाकी रंगाच्या गोण्या, ४)९९,०००/- रुपये किमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला व्हि-१ तंबाखू एकूण ३गोण्या, एका गोणीत ५ सफेद लहान गोण्या, ५)७२,६०० रुपये किमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला व्हि-१ तंबाखू एकूण १५ गोण्या, एका गोणीत १० लहान गोण्या, एका गोणीत २२ पॅकेट ६)३१,२००/- रुपये किमतीचा महाराष्ट्रात बंदी असलेला व्हि-१ तंबाखू एकूण ५ सफेद रंगाच्या लहान गोण्या, एका गोणीत ४ लहान गोणी, एका लहान गोणीमध्ये जांभळ्या रंगाचे २२ पॅकेट, एक पॅकेट ३० रुपये किमतीचे ७) १०,००,०००/- रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण २५,३७,४००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींच्या विरुद्धात तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र. ०६/२०२१ भा.द.वि.स.क. -३२८,१८८,२७२,२७३ सहा अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने कलम- २६(२),२७,२३,२६(२)(४),३०(२)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपी शामशाद अब्दुल हनान याला दिनांक. ९/१/२०२१ रोजी ०८:०४ वाजता अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
