नालासोपारा : मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीस नालासोपारा पोलिसांनी अटक करून मुद्देमाल केला जप्त . अधिक माहितीनुसार दि २१/०९/२०२२ रोजी रात्री ०८.३० वा.दरम्यान विनोद वासुदेव नाईक, रा. आलोक निवास, नालासोपारा (पश्चिम) यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल ही त्यांच्या घराच्या अंगणात पार्क करुन ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांची मोटारसायकल चोरी केल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नालासोपारा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
नालासोपारा इथे मोटारसायकल चोरी होण्याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर गुन्हयांना आळा घालण्यासाठी व दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी महेश लनु दादोडे, रा. वसईफाटा यास दिनांक २९/०९/२०२२ रोजी नमूद गुन्हयात पोलिसांनी अटक केली असून आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने नालासोपारा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये तसेच तुळींज पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ४ मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ४ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून एकूण ४ गुन्हयांची उकल करण्यात पोलिसानं यश आले.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाधुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ , श्री. चंद्रकांत जाधव, सहा. पो.आयुक्त नालासोपारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विलास सुपे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे, श्री. राहुल सोनावणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स.पो.नि. पंडीत मस्के, अमोल तळेकर, पो.हवा. किशोर धनु, पो.ना. सचिन कांबळे, अमोल तटकरे, पो.शि. कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर यांनी केलेली आहे.
