हिंगोली : दि.१९.०५.२०२२ श्री एम.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोरेगाव यांचे पथका मार्फत धडक कार्यवाही करून मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे.
मिळलेल्या माहिती नुसार संजय रामचंद्र कावरखे वय ४५ वर्षे यांनी आपल्या शेतात पाणी देण्यासाठी लावलेल्या मोटरचे स्टॅटर ,ऑटोस्विच व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स कि अ.७,००० रू चे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दिनांक ११ ते १२ च्या दरम्यान चोरून नेले याबाबत त्यांनी पोलीस ठाणे गोरेगांव जि. हिंगोली याठीकाणी येवुन तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्हयाचा तपास श्रीदेवी पाटील स.पोलीस निरीक्षक पोस्टे गोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोना/उजगरे हे करीत असताना त्यांनी संशयित आरोपी १)दिपक काळुराम काटुळे वय २० वर्षे २) रवि गणपत मोरे वय २८ वर्षे ३) शंकर विश्वनाथ नितनवरे वय १९ वर्षे ४) गोविंदा बबन सोळंके वय २६ वर्षे ५)गोपाल बबन साळुके वय २६ वर्षे ६) प्रभाकर विठठल जाधव वय २९ वर्ष व आणखी एक असे एकूण ७ जणांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे व सदर गुन्हयातील सर्व मुददेमाल आरोपी कडुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या व्यतीरिक्त आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये नमुद आरोपीनी वेगवेळ्या ठिकानी चोरी केल्याचे कबुल केलेअसून त्यांचेकडुन जप्त करण्यात आलेल्या वाहणापैकी १ हिंगोली २. अकोला ३ वाशिम या ठिकाणी हि त्यांचा विरुद्ध गुन्हे दाखल आहेत . पोलिसांना तपासादरम्यान समोर आलेल्या माहिती नुसार आरोपी कडून मोटरचे स्टॅटर , ऑटोस्विच व तिन फयुज असलेला लोखंडी बॉक्स व चार मोटार सायकल असा एकुन २,७७,०००/-मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाही श्री.एम.राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली, श्री.यशवंत काळे. अप्पर अधिक्षक साहेब हिंगोली, श्री यतीष देशमुख सहायक पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली श्री.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब हिंगोली ग्रा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गोरेगाव येथील श्रीदेवी पाटील स.पोलीस निरीक्षक , पोलीस अमंलदार राहुल गोटरे, पोलीस अमंलदार शाम उजगरे, पोलीस आमंलदार काशिनाथ शिंदे, पोलीस अमंलदार विजय कालवे व इतर यांनी केली आहे.
