मिरारोड : दिनांक २९/०८/२०२१ रोजी रात्री ०९:०० वाजताचे सुमारास फॉर्म्युन हाईट्स बिल्डींगचे समोर हाटकेश मिरारोड पुर्व येथे काहि इसम मोटरसायकल वरून जात असतांना एका लाल टि शर्ट घातलेल्या इसमाने कट मारला या कारणावरून रागावलेले इसम त्या लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. तेव्हा सदर ठिकाणी शुभम भुवड वय-१८ हा त्याचे मित्रांसोबत उभा होता तसेच शुभम भुवड यानेही लाल रंगाचा टी शर्ट घातलेला असल्याने आरोपी यांचे गाडीला कट मारणारा हा तोच इसम आहे असे समजुन यातील आरोपीनी वेगवेगळया वाहनांनी येवून मयत शुभम यास लाथा बुक्यांनी जबर मारहाण करून त्यास जिवे ठार मारले. सदर घटनेबाबत मयताचे वडिल श्री. शांताराम भुवड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी १) विनोद हिरालाल उपाध्याय वय-४४, २) आकाश दिलीप हिरवे वय-२५, ३) कुणाल दिलीप किणी वय-३३, ४) अमृत उर्फ सनी शशिकांत उपाध्याय वय-२५, ५) वसीम अल्ताफ शेख वय-३२, ६) मोहम्मद राजु इर्षाद शेख वय-३२, ७) जतीन विनोद उपाध्याय वय-२०, ८) सायस बाबुराव मुंढे वय-२० व इतरांविरुध्द दिनांक ३०/०८/२०२१ रोजी काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीना मा. न्यायालयाने दि ०३/०९/२०२१ रोजी पर्यत अधिक तपासासाठी पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच यातील आरोपीतांनी गुन्हा करण्यासाठी वापरले वाहन व त्यांचे ताब्यातील इतर वस्तू तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर गुन्हा करण्यामागे मोटार सायकलला कट मारला, हेच कारण आहे अगर इतर कारण आहे याबाबत पुढिल तपास श्री. जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, काशिमीरा पोलीस स्टेशन हे वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली करित आहे.
