डोंबिवली : डोंबिवली परिसरांमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण खुप वाढल्याने नमुद गुन्हयाचा तपास करण्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ भालेराव सो यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश वडणे व पथक यांना सांगितले होते . त्याचप्रमाणे दिनांक: ०४/११/२०२१ रोजी सकाळच्या सुमारास गांधी गार्डन, नगरसेवक श्री. शैलेश धात्रक यांच्या कार्यालयासमोर समोर, डोंबिवली पश्चिम येथुन एक होंडा कंपनीची सी.डी.डिलक्स मोटारसायकल चोरी झाली म्हणुन विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पो.ना.लोखंडे यांच्याकडे देण्यात आला .
नमुद गुन्हयाच्या घटनास्थळाच्या परिसरांतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरे पोलिसांनी तपासले असता एका सी.सी.टी.व्ही. कॅमेरामध्ये दोन इसम गुन्हयात चोरीस गेलेली मोटारसायकल ढकलत घेवुन जात असल्याचे दिसुन आले. नमुद इसमांची बातमीदारांमार्फतीने ओखळ पटवुन दिलीप शांताराम पाटील त्याचे ठिकाण बदलत असताना व शेवट मोबाईल लोकेशन बघून कौशल्यपुर्ण तपास करुन परोळा, जळगाव येथुन ताब्यात घेतले व त्याच्या मार्फतीने दुसऱ्या आरोपीस रोहित अविनाश यादव यास चिंचपाडा, कल्याण पुर्व येथुन ताब्यात घेण्यात आले. नमुद दोन्ही आरोपीकडे चौकशी केली असता वर नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली असून आरोपी दिलीप पाटील याच्या नावावर विष्णू नगर पोलीस ठाण्यात आणखी ५ मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडुन त्या हस्तगत केल्या आहेत . आरोपीकडून एकूण ९ मोटारसायकल पोलिसानी हस्तगत केल्या आहेत
सदरची कारवाई हि श्री. दत्तात्रय कराळे सो, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, श्री. सचिन गुंजाळ सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. जयराम मोरे सो डोंबिवली विभाग व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंढरीनाथ भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीरण अधिकारी स.पो.नि.श्री. गणेश वडणे, पो.हवा./ पाटणकर, पोशि/भामरे, पोशि/ मिसाळ, पो.ना. / लोखंडे, पो.ना. /सांगळे व पो.ना.क./कांगुणे यांनी सदरची करवाई यशस्वीपणे पार पाडली आहे.
