डहाणू : रत्याचे कडेला पार्क केलेल्या मोटार सायकली चोरी करणाऱ्या आरोपीना डहाणू पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार डहाणू पोलीस ठाणे हद्दीत माहे जुन व जुलै २०२२ मध्ये डहाणू रेल्वे स्टेशन पुर्व भागातील रत्याचे कडेला पार्क केलेल्या मोटार सायकली चोरुन नेण्याचे प्रमाण वाढत होते. त्यासंदर्भात गेले दोन महिन्यात डहाणू पोलीस ठाणे येथे मोटार सायकलचे चोरीचे एकुण ०७ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरीचे गांर्भीय लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग अतिरिक्त कार्यभार डहाणू विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलीस तपास पथके तयार करुन अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मोटार सायकलींचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याबाबत आदेशपोलीस पथकास देण्यात आले.
त्यानुसार सदर पथकापैकी सपोनि/ व्ही. एस. नार्वेकर यांना गोपनीय सुत्राकडून माहिती मिळाली की, डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील एक इसम काही कामधंदा न करता मोटर सायकल चोरी करुन कमी किंमतीत मोटर सायकलची विक्री करतो अशी माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने एक संशयीत इसम वय वर्षे ३१ रा. लोणीपाडा कुंकुवाडी, रुम नं. ०४ शाहनवाज चाळ ता. डहाणु जि. पालघर यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता संशयीत इसम हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीने डहाणु रेल्वे स्टेशन पुर्व या परीसरातून ०७ मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ०७ गुन्हयांची उकल करण्यात आली आहे तसेच आरोपी याच्या ताब्यातून एकूण २,२३,०००/- रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सपोनि/व्ही. एस. नार्वेकर,डहाणू पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. प्रकश गायकवाड , अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, अतिरीक्त कार्यभार डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी डहाणु पोलीस ठाणे, सपोनि/व्हि.एस. नार्वेकर, सफौ/सुनिल नलावडे, पोहवा/ चौधरी, पोहवा/रासम, पोहवा/खांडवी, पोना/कहार, पोना/भरसट, पोशि/कदम, पोशि/थाळेकर सर्व नेमणूक डहाणू पोलीस ठाणे यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.
