दि.२७/१०/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष मिरा- भाईंदर, वसई- विरार आयुक्तालय यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळली कि उत्तन धावगी डोंगरी भाईंदर (पश्चिम) येथील लालबहादुर शास्त्री नगर कचरा डेपो कडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती त्याचा जवळ मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ असुन तो त्याची विक्री करतो सदर मिळालेली बातमी वरिष्ठांना कळवुन त्यांच्या सुचना व मार्गदर्शना नुसार पोलीस पथकाने छापा कारवाई करुन एकुण २२ ग्रॅम वजनाचा १,१०,०००/-रु.किंमतीचा मॅफेड्रॉन पदार्थ शहाबाज आसिफ खान ऊर्फ बबलु वय २३ वर्षे याच्या जवळ असलेला पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपी अटक करण्यात आली आहे व त्याच्या विरुद्ध उत्तन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई श्री.महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक, श्री. देवीदास हंडोरे, स.पो.नि.विलास कुटे, म.स.पो.नि. तेजश्री शिंदे नेम. भरोसा सेल,पो. हवा. धनाजी इंगळे,पो.ना.पवन पाटील, पो.शि. अजय यादव, विष्णुदेव घरबुडे, आफरीन जुनैदी नेम. भरोसा सेल यांनी केली आहे.
