भाईंदर : मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊस वर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथक यांनी कारवाई करून ०१ पिडीत मुलीची सुटका केली . अधिकमाहितीनुसार दिनांक ०५/०५/२०२३ रोजी भाईंदर प्रतिबंध कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हॉटेल मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊस, चौली, उत्तन-गाराई रोड, उत्तन, भाईंदर प. या हॉटेल / गेस्ट हाऊसचा मॅनेजर व वेटर हे त्यांच्या हॉटेल/ गेस्ट हाऊसमध्ये येणान्या पुरुष गि-हाईकांनी वेश्यागमनासाठी मुलींची मागणी केल्यास हॉटेलचा वेटर हा प्रत्यक्ष त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मुलींचे फोटो दाखवुन गि-हाईकाने पसंत केल्यानंतर वेश्यागमनाचा व रुम भाडे असा मोबदला घेवुन मुली पुरवितात.
या माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे पो.नि. श्री. समीर अहिरराव यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन बोगस गि-हाईक व पंच यांना हॉटेल मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊस, या ठिकाणी पाठवुन मिळालेल्या बातमीची सत्यता पडताळुन पंच व पोलीस पथकासह छापा कारवाई केली. सदर छापा कारवाईमध्ये हॉटेल मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊसचा मॅनेजर विजय साव व वेटर रामलाल उर्फ कुबलाल महतो यांनी बोगस गि-हाईकास त्यांच्या मोबाईलमधील मुलीचे फोटो दाखवुन वेश्यागमनाचा मोबदला ठरवुन वेटर रामलाल उर्फ कुबलाल यांच्यामार्फतीने वेश्यागमनाचा मोबदला स्वीकारुन बोगस गि-हाईकास वेश्यागमनाकरीता ०१ मुलगी पुरविल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सापळयातील रोख रक्क्म व इतर मुद्देमालासह एका पिडित मुलीची सुटका करुन हॉटेल मॅक्सवेल कम हॉलीडे होम, गेस्ट हाऊसचे मालक १) मॅक्सवेल मार्शल डिसोजा २) नेवील जेरोम डिसोजा, व्यवस्थापकिय मॅनेजर ३) विजय कालेश्वर साव, मॅनेजर, ४) रामलाल उर्फ कुबलाल अमरु महतो, ५) मेघलाल बद्री महतो, ६) अशोककुमार गोविंद सिंग, ७) हेमलाल लिलो महतो यांना ताब्यात घेवुन यांचे विरुध्द स.फौ. उमेश हरी पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन उत्तन सागरी पोलीस ठाणेते गुन्हा दिनांक ०६.०५.२०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे पो.नि. श्री. समीर अहिरराव, स.फौ. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो.अंम. केशव शिंदे, चा. पो. हवा. सम्राट गावडे, म.पो. अंम. अश्विनी भिलारे, महिला म.स.ब. अश्विनी वाघमारे यांनी केली आहे.
