विरार : विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुव्हर्स अँड पॅकर्स च्या बहाण्याने घरात प्रवेश करुन चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली असून याप्रकारचे ०२ गुन्हे देखिल उघडकीस आणले आहेत. अधिक माहितीनुसार विरार पोलीस ठाणे हद्दित मुव्हर्स अँड पॅकर्स म्हणुन घरातील सामान पॅक करुन शिप्ट करण्यासाठी आलेल्या कामगारांनी सामान पॅक करतेवेळी बॅगमधील किंमती सोने व चांदीचे मौल्यावान दागिने चोरी केले याबाबत फिर्यादी यांनी दिनांक ३१/०५/२०२२ रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाख्नेच्या अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयांचा तपास सुरु केला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देवुन तांत्रीक माहितीचे आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढुन आरोपी १) शुभमकुमार धन्नुलाल वर्मा, रा.ठी. कांदिवली, आकोली रोड, क्रांती नगर, गणेश चाळ,मुंबई-१०१, मुळ रा. उत्तरप्रदेश २) दिपक राजेशकुमार विश्वकर्मा, रा.ठी. शितला माता चाळ, विनय टॉवर, कांदिवली पुर्व, , मुळ रा. राज्य-उत्तरप्रदेश यांना कुरार, मुंबई येथुन ताब्यात घेऊन तपासअंती अटक केली आहे. आरोपींकडे पोलिसांनी गुन्हांच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांच्याकडुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले एकुण रु. ११,००,७०८/- किंमतीचे सोने – चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत.तसेच सदर आरोपी यांचा मुंबई येथील ओशिवरा पोलीस ठाणे, येथील गुन्हयांत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल किं.अं.रु. ३०,०००/- चा सॅमसंग कंपनीचा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३,विरार , श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग, श्री. सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे, श्री. दिलीप राख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदेश राणे, पो.हवा. सचिन लोखंडे, संदिप शेरमाळे, पो.ना. हर्षद चव्हाण, पो.शि.संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, रवी वानखेडे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सागर घुगरकर यांनी केली आहे.
