दिनांक : २९/०९/२०२१ : अफजल गुलाब नबी खान. वय – ५४ वर्षे, हे दिनांक – ०६/०९/२०२१ रोजी केवडीया एक्सप्रेस ने प्रवास करीत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेवून अज्ञात इसमाने त्याच्या पॅन्ट मधील १९,९९०/- रु. किमतीचा मोबाईल त्यांच्या नकळत चोरी केला याबाबत त्यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली त्यावरून त्या अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी शोधण्यासाठी त्याचा आय. एम. इ. आय. क्रमांक सर्व नेटवर्क पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना मा. वरिष्ठ कार्यालयाच्या मार्फतीने देण्यात आला होता त्याचवेळी तो मोबाईल जियो कपंनीचे सीमकार्ड टाकून कुणीतरी बापू ताराचंद पवार राह.माहिम (प) वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याबातमीच्या आधारे मिळालेल्या नंबर वर फोन केला असता समोरून त्यांनी उचलुन तो त्यांचा मुलगा – शंकर बापु पवार आहे व ते हा फोन वापरत आहे अशी माहिती देवून मोबाईल स्विच ऑफ केला. त्यावेळी सदर पत्ता अपूर्ण असल्यामुळे सदर इसम पोलिसांना सापडला नाही नंतर गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहिती वरून आरोपी दादर (पश्चिम) येथे गजरा विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त झाली. पण तो त्याठिकाणाहून हि सापडला नाही . अखेर तो महापे, घणसोली परिसरात राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यास त्याचा राहत्या घरातून अटक केली. सदर फोन त्याने दादर फुलमार्केट येथिल गटारात टाकुन दिल्याची माहीती दिली . आरोपीने दिलेल्या माहीती प्रमाणे दादर फुलमार्केट येथिल गटारातुन मोबाईल फोन हस्तगत करुन विरळ गुन्हा मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे यांनी उघडकीस आणला .
सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक – श्री. एस. जे. कदम, पो. हवा. डी. जी. गोपाळे., पो. हवा. डब्ल्यु. ए. शेख, पो. हवा. एन. वाय. खाडे., पो. हवा. व्ही. झेड. आखाडे, पो. ना. एस. एस. कांबळे, पो.शि. ए.एन. मराळ, पो.शि. व्ही. बी. गोपाळ, पो. शि. पी. आर. होनमाने यांनी नमुद गुन्ह्याच्या तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
