भाईंदर पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर एम. बी. एम. सी,बेस्ट,एसटी,शिवशाही अश्या अनेक प्रकारच्या रिकाम्या बसेस पार्किंग करून नागरिकांना त्रास देत आहेत. वेळोप्रसंगी रुग्णवाहिकेला ही जाण्यासाठी जागा नसते, उभ्या मालकी वाहनांना या बसेस घासून जातात व सदरचा परिसर आपलाच आहे असे मिरवतात.
अनेक रिक्षा मालकी वाहने याला बळी पडतात या मुळे ट्राफिक पण मोट्या प्रमाणात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसेस उभ्याकरून सामान्य नागरिकाला पायी चालणे अवघड होते. त्याच प्रमाणे दुकानदार दुकानाच्या बाहेर रस्त्यावर उभ्या दुचाकी पार्क करतात. यामुळे जेष्ठ नागरिक,लहान मुले महिला याना बाहेर खरेदीला जाताना या त्रासाचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
