मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरीक्षक आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने सन्मानित

Latest News

मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल मीरा भाईंदरमधील ५ पोलीस उपनिरक्षकांना केंद्र शासनाने जाहीर केलेले. आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तर सहाय्य्क पोलीस आयुक्त शशिकांत भोसले याना महाराष्ट्र शासनाने विशेष सेवा पदक देण्यात आले.

मीरा भाईंदर मधील नयानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुहेल पठाण, पोलीस उपनिरीक्षक आशुतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे तर नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक धनंजय गायकवाड यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदकाने गौरवण्यात आले.

ह्या पाच पोलीस उपनिरीक्षकांनी २०१६ ते २०१९ दरम्यान गडचिरोली सारख्या अतिदुर्गम नक्षली भागात उल्लेखनीय काम केल्या बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करण्यात आले. तर नवघर नयानगर भागाचे सहाय्य्क पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांना शासनाने विशेष सेवा पदक देण्यात आले आहे. भोसले ह्यांनी देखील गडचिरोली ह्या नक्षल भागात २०१७ ते २०१९ दरम्यान खडतर सेवा बजावली आहे.

पोलीस आयुक्तालयातील प्रजासत्ताक दिनाच्या ह्या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर व अमित काळे, सहाय्य्क आयुक्त विलास सानप आदी अधिकारी उपस्थित होते.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply