दिनांक ०१/१०/२०२१ रोजी मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस एक वर्ष पुर्ण झाल्याने पोलीस आयुक्तालयाचे वतीने दिनांक ०१/१०/२०२१ ते ०७/१०/२०२१ रोजी पर्यंत पोलीस आयुक्त कार्यालय, शाखा व सर्व पोलीस स्टेशन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने विरार पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक ०१/१०/२०२१ रोजी सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात आले आहे. सदर कार्यक्रमादरम्यान कॉलेज मधील प्राध्यापक, विदयार्थीनी, डॉक्टर, नर्सेस, बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सायबर गुन्हयांमार्फत नागरिकांची कशी फसवणुक केली जाते व त्यापासून नागरिकांनी कशाप्रकारे सावध रहायला हवे याकरिता सदर अभियाना दरम्यान माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये वक्ते म्हणून श्रीमती रेश्मा साळुखे व सायबर तज्ञ श्री विक्रांत पवार यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी श्री प्रशांत वाघुडे, पोलीस आयुक्त परिमंडळ-३, श्रीमती रेणुका बागडे, सहा पोलीस आयुक्त व विरार पोलीस स्टेशनचे अधिकारी-अंमलदार उपस्थित होते.
