मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन , पॅरा ग्लायडर्स , रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट उडविण्यास बंदी . पोलीस उपआयुक्त मुख्यालय यांचे मनाई आदेश लागू .

Regional News

मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन ,  पॅरा ग्लायडर्स , रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट यांचेवर नियमन व नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बध घालणे गरजेचे असल्याने श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यलाय ) , मिरा – भाईंदर , वसई – विरार आयुक्तालय यांनी मानवी जीवितास ,आरोग्यास , संरक्षणास बाधा निर्माण करण्याची तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची शक्यता आहे अशा  ड्रोन ,  पॅरा ग्लायडर्स , रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट चा वापर यावर फौजदारी प्रक्रिया १९३७ चे कलम १४४(१) (२) अन्वये मनाई आदेश लागू केलेले आहेत . त्याचप्रमाणे मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या हवाई सर्वक्षणास व मा. पोलीस आयुक्त यांचेकडून विशेष परवानगीने करण्यात येणाऱ्या वापरास सदर मनाई आदेशातील तरतुदी लागू असणार नाहीत .

सदर आदेशाचा कालावधी हा दिनांक १०/०७/२०२१ रोजी ००.०१ पासून तो दिनांक ०९/०९/२०२१ रोजी २४.०० वाजे पर्यत लागू राहील.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply