भाईंदर : दि. १६ .- मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांनी गुन्ह्याची उकल ८९ टक्के करून राज्यात प्रथम स्थान पटकवून यश मिळविले आहे या यशात पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांचे मोलाचे यॊग्यदान आहे.
गुन्ह्याची उकल करून गुन्ह्यातील आरोपी यांना ताबडतोब अटक करून गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रत्येक क्षणी तत्पर असतात . मिरा भाईंदर मध्ये वाढते गुन्ह्याचे प्रमाण बघता २०२० रोजी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या आयुक्तलयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून डॉ. सदानंद दाते यांची निवड करण्यात आली. मिरा भाईंदर वसई विरार हद्दीत कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी दाते यांनी पूर्णपणे निभावली.मिरा भाईंदर वसई विरार शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आले आहे. दाते यांच्या मार्गदर्शनामुळेच मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय राज्यात प्रथम क्रमांकावर पोहचण्याचे यश प्राप्त झाले आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अप्पर पोलीस महासंचालक रितेशकुमार यांच्या अहवाल नुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ५५. ३६ टक्के असून सर्व पोलीसआयुक्तालया मधून मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय यांनी ८९. ६३ टक्के मिळून प्रथम स्थान पटकावले असून दुसऱ्या क्रमांकावर अमरावती पोलीस आयुक्तालय यांनी ५८. ४९ टक्के मिळवून स्थान मिळवले आहे ,तसेच तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई पोलीस यांनी ५४.७८ टक्के ,चौथ्या क्रमांकावर ठाणे शहर ५४. ०८ टक्के , मुंबई पोलीस ५२.१८ टक्के सहाव्या क्रमांकावर असून नागपूर ५१. ६३ टक्के गुन्हे सिद्ध करण्यात सहाव्या क्रमांकावर असून नाशिक पोलीस आयुक्तालय शेवटच्या स्थानावर आहे.
