दिनांक ३० जुलै शुक्रवार रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुसूत्रता आणण्याकरीता महापालिका मुख्यालयात प्रवेश करणेसाठी परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. मंत्रालय
प्रवेशाकरीता राज्य शासनाने पत्रकारांसाठी निश्चित केलेल्या धोरणानुसारच मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात पत्रकारांना प्रवेश दिला जाणार आहे. परिपत्रकानुसार पत्रकार यांना सकाळी 10.30 ते दुपारी 03.00वाजेपर्यंत प्रवेश राहील असे नमूद करण्यात आले होते. या प्रवेश वेळेच्या अनुषंगाने पत्रकारांच्या मनात गैरसमज निर्माण झाले होते. हा गैरसमज निर्माण झाल्यामुळे आज पत्रकारांनी मा. आयुक्त श्री. दिलीप ढोले यांची भेट घेतली. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (मुख्यालय) श्री. मारुती गायकवाड, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) श्री. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री.अजित मुठे, उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य विभाग) श्री. संजय शिंदे, , जनसंपर्क अधिकारी श्री. राजकुमार घरत व वरिष्ठ लिपीक (जनसंपर्क) श्री. जितेंद्र कांबळे उपस्थित होते.पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेऊन मा. आयुक्त यांनी पत्रकारांना प्रवेश वेळेच्या अनुषंगाने गैरसमज झालाअसल्याचे सांगितले. पत्रकार हे पत्रकार कक्षात बसून दुपारी 3.00 वाजल्यानंतरही वृत्तसंकलन करू शकतात असे मा.आयुक्त यांनी सांगितले. जर एखाद्या वेळी अपवादात्मक परिस्थितीत पत्रकारांना दुपारी 3.00 वाजल्यानंतरमहापालिकेत प्रवेश करावयाचा असल्यास त्या पत्रकारांना महानगरपालिकेत प्रवेश देण्यात येईल असे मा. आयुक्तश्री. दिलीप ढोले यांनी सांगितले. यावर सर्व पत्रकारांनी मा. आयुक्त यांनी गैरसमज दूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
महानगरपालिका प्रशासनाने मुख्यालय प्रवेश संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकासंदर्भात बोलताना आयुक्त दिलीप ढोले यांनी महापालिका मुख्यालयातील प्रवेशासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला. तसेच मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचे कडक निर्बंध लागले नसून मंत्रालयात पत्रकारांना प्रवेश देण्याकरीता राज्य शासनाने निश्चित केलेल्या निर्णयाच्याअनुषंगानेच मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात स्थानिक वृत्तपत्र आणि दुरचित्र वाहिन्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट केले.
