कोरोना विषाणूच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन क्र. डीएमयु /२०२०/सीआर ९२/ आपत्ती व्यवस्थापन -१ दिनांक ४/६/२०२१ अन्वये आदेश लागू केलेला असुन कोरोना विषाणु संसर्गाचा कमी झालेला प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात यापूर्वी लागु केलेल्या मनाई आदेशातील निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे.
सदर आदेशास अनुसरून श्री. विजयकांत सागर , पोलीस उपआयुक्त (मुख्यलाय ) , मिरा भाईंदर , वसई विरार आयुक्तालय यांनी फौजदारी प्रक्रिया नुसार २८. ०६ .२०२१ रोजीचे सकाळी ७. ०० वाजे पासून दिनांक ०५/०७/२०२१ रोजीचे सकाळी ०७. ०० वाजे पर्यंत मनाई आदेश लागू केलेले होते . शासनाने निर्गमित केलेल्या उपरोक्त आदेशास अधिन राहूनमिरा भाईंदर , वसई विरार पोलीस आयुक्तालयातील कोविड संसर्गाचा तात्काळ प्रतिबंधक उपाय योजना म्हणून दिनांक १८/०६/२०२१ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मनाई आदेशामध्ये मिरा भाईंदर मनगरपालिका क्षेत्र हे Levels of Restrictions For Breaking The Chain अंतर्गत स्तर -३ मध्ये समाविष्ट असल्याने या स्तराचे सर्व निर्बंध दिनांक ०४/०६/२०२१ रोजीचे शासन आदेशानुसार जसेच्या तसे लागू राहतील .
सदरचा मनाई आदेश हा दिनांक ५/७/२०२१ रोजीचे सकाळी ०७. ०० वाजल्यापासून दिनांक १२/०७/२०२१ रोजीचे सकाळी ०७. ०० वाजे पर्यंत मिरा भाईंदर , वासी विरार पोल्स आयुक्तलयातील मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दी करिता लागू राहतील .
