मिरा-भाईंदर : दि.०१.१०.२०२१ रोजी पोलीस आयुक्त, भाईंदर कार्यालय, येथे मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते ‘भरोसा सेल’ कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. मिरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिसांचार/कौटुबिक हिसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभुमीवर महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देवून त्यांचे समुपदेशन करुन मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करणे यासाठी मा. पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार यांच्या संकल्पनेतुन या कक्षाची स्थापना करण्यात आली. भरोसा कक्षाच्या माध्यमातून मुख्यत्वेकरुन महिलांशी संबंधित तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. तसेच कौटुंबिक वाद-विवाद/कलह समोपचाराने कसे सोडवता येईल? यादृष्टीने भरोसा सेल कक्षामध्ये महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार काम पाहणार आहेत.
मिरा-भाईंदर परिमंडळ ०१ मधील पोलीस ठाण्यात महिलांच्या संबंधित तक्रारी भरोसा कक्षाकडे पाठविण्यात येणार आहेत. कक्षामध्ये महिला पोलीस अधिकारी, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, एन.जी.ओ., एम.एस.डब्ल्यु., वकिल व संरक्षण अधिकारी यांचा सामावेश असुन महिलांच्या समस्या जाणुन घेवुन समोपचाराने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सदर कार्याक्रमासाठी मा. श्री एस. जयकुमार, अप्पर पोलीस आयुक्त, डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त, श्री शशिकांत भोसले, श्री. रामचंद्र देशमुख, श्री शांतीलाल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संपतराव पाटील, श्री. मुकुटलाल पाटील, श्री. मिलिंद देसाई, श्री. प्रशांत लांगी, मसपोनि. तेजश्री शिंदे- भरोसा सेल, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
