सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०३/०३/२०२१ रोजी श्री.अमित काळे, पोलीस आयुक्त परिमंडळ-१ यांना माहिती मिळाली की, मिरारोड पुर्व, शितलनगर येथील रश्मीपार्क बिल्डींगमध्ये तळमजल्यावरील शिशा लॉन्ज हुक्का पार्लरमध्ये ग्राहकांना हर्बल हुक्क्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधीत केलेला तंबाख्नुजन्य हुक्का अवैधरित्या ओढण्यासाठी उपलब्ध करुन देत आहेत.
सदर बातमीची खात्री करून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ यांचे पथकानी मिळालेल्या माहीतीच्या आधारे शिशा लॉन्ज हुक्का पार्लरमध्ये रात्री पंचासह छापा घातला.
सदर ठिकाणी शिशा लॉन्ज हुक्का पार्लरचे चालक, मॅनेजर व हॉटेलचे कर्मचारी यांनी स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता सार्वजनिक ठिकाणी हुक्का पार्लरमधील ग्राहकांना तंबाख्नु जन्य हुक्का ओढण्या-पिण्यासाठी उपलब्ध करून ग्राहकांच्या टेबलावर हुक्क्याचे काचेचे पॉट व त्यावर फिल्टरमध्ये जळता कोळसा ठेवुन मानवी जीवन धोक्यात येईल असे हयगयीचे कृत्य केले तसेच कोरोना या महामारीच्या रोगाचे पार्श्वभुमिवर कंडीशनल लॉकडाऊनच्या कालावधीत शासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन हर्बल हुक्का पार्लरच्या आड बेकायदेशिर तंबाखूयुक्त हुक्का
पार्लर चालविले.
तसेच हुक्का पार्लरमधील ग्राहक हे त्या ठिकाणी प्रतिबंधीत तंबाख्नुजन्य हुक्का पित/ओढत असताना मिळुन आले. घटनास्थळी मिळुन आलेले २०,२१० रुपयाचा बेकायदेशीर हक्का पार्लरचा मुद्देमाल जप्त करुन हुक्का पार्लर चालक/मालक, मॅनेजर, वेटर असे ७ व ११ ग्राहकांविरुध्द मिरारोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर । ८३ /२०२१ भादंवि कलम १८८, २६९, २७०, २७२, २८५, ३३६, ३४ सह कोप्टा अॅक्ट कलम ४, २१, साथरोग प्रतिबंध अधिनियम २, ३, ४ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०१ मिरारोड, सपोनि/ दत्तुसाहेब लोंढे, सफो. विनायक मगर,आणि पथक यांनी केली आहे.
