मिरारोड : दिनांक २२/११/२०२१ रोजी ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार याठिकाणी परवाना नसतांना मुलींना वेटरचे काम आहे सांगुन मुलींच्या नाच गाण्याच्या नावावर अश्लिल नृत्य चालू असते अशी बातमी पोलीस उप-आयुक्त, गुन्हे यांना त्यांच्या बातमीदाराकडुन अशी माहीती मिळाली त्यावरून पोलीस उप-आयुक्त, गुन्हे यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वपोनि. पाटील व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथक यांनी माणसे पाठवुन माहितीची सत्यता पडताळुन ऐश्वर्या ऑर्केस्ट्रा बार येथे छापा टाकला असता त्यावेळी बारमध्ये मुली नृत्य व अश्लिल नृत्य करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच बारचे चालक/मालक, व्यवस्थापक, कॅशियर व वेटर हे बारमधील मुलींना नृत्य व अश्लिल नृत्य करण्यास बंदी असताना नृत्य करण्यास भाग पाडुन प्रोत्साहित करीत असतांना पोलिसांना आढळून आहे .यामुळे बारचे चालक/मालक, व्यवस्थापक, कॅशियर व वेटर यांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार केशव शिंदे, नेमणुक- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्रीमती. पदमजा बडे, (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री. संपतराव पाटील, मसपोनि. तेजश्री शिंदे-भरोसा सेल, पोशि/ केशव शिंदे व पोनि श्री. सचिन कोतमिरे, सपोनि श्री नितीन जगताप, मपोउपनि श्रीमती तांबडे, पोना/महाकुलकर, चालक पोशि/काटे सर्व नेम. मिरारोड पोलीस ठाणे यांनी संयुक्तिकरित्या केली आहे.
