दिनांक : ३०/०८/२०२१ रोजी माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंबाडी रोड या ठिकाणी दिवसा घरफोडी झाली होती. माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग ६ दिवस घटनास्थळावरील पुरावे हस्तगत करुन तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींच्या राहण्याचे ठिकाण शोधले. त्यानंतर सलग दोन दिवस आरोपींवर पाळत ठेवुन सापळा रचुन एकुण पाच आरोपी १) अभिषेक कामेश्वर सिंग, वय २४ वर्षे, रा. जि. पुर्णीया, राज्य- बिहार. २) मोहमंद तुफेल मोहमंद जलाल, वय २६ वर्षे, रा. जि. पुर्णीया, राज्यबिहार. ३) रंजीत दशरथ सहानी, वय ३८ वर्षे, जि. पुर्णीया, राज्य- बिहार. ४) आशिषकुमार अमोल यादव, वय २२ वर्षे, जि. पुर्णीया, राज्य- बिहार. व ५) बिरु रामविलास पासवान, वय २६ वर्षे, धंदा- नाही, रा. गाव व पो. गुलाबबाग, जि. पुर्णीया, राज्य- बिहार यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी करुन चोरी केलेली मालमत्ता आरोपी संतोष भिवा पाटील, वय ४६ वर्षे, रा. ठाणा- सफाळे, ता.जि. पालघर याच्यामार्फत विक्री केल्याचे सांगितले एकुण १५७ ग्रॅम सोन्याच्या वस्तु, ५१० ग्रॅम चांदीच्या वस्तु व रु. ७००/- रोख रक्कम असे एकुण रु. ६,१२,०००/- किंमतीच्या वस्तु आरोपींन कडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी या अगोदर या प्रकारचे ०३ गुन्हे केल्याचे पोलीस तपासा दरम्यान समोर आले.
सदरची कारवाई श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- २, वसई, श्री. प्रदीप गिरीधर, सहाय्यक पोलीस आयुक्त, वसई विभाग यांचे मार्गदर्शनाखालील श्री. भाऊसाहेब आहेर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे, पो.नि. अभिजित मडके (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. श्री. सचिन सानप, पो.उ.नि. रोहिणी डोके, पो.ह. शैलेश पाटिल, पो.ना. धनंजय चौधरी, पो.ना. शामेश चंदनशिवे, पो.शि. किरण आव्हाड, पो.शि. गोपाळ कोळेकर, पो.शि. हेमंत कोरडे व म.पो.शि. पुजा कांबळे यांनी केलेली आहे.
