काशिमीरा – ३० वर्षापुर्वी एक २७ वर्षाची महिला व तिच्या ५ वर्षाखालील ४ बालकांचा तिक्ष्ण हत्याराने खुन करणारे स्वतःचे नांव व अस्तित्व बदलुन, मांत्रीक / बुवा बनुन रहाणारे, गुन्ह्यांतील मुख्य आरोपी दोन सख्ख्या भावांना वाराणसी, उत्तर प्रदेश राज्यातुन अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष- १ यांना यश अधिक माहितीनुसार १९९४ यावर्षी फिर्यादी राजनारायण शिवचरण प्रजापती राठी. पेणकर पाडा, काशिमीरा, ता. जि. ठाणे. मुळ रा. जिल्हा इलाहाबाद, उत्तर प्रदेश यांची पत्नी कै. सौ. जगरानीदेवी प्रजापती हिच्या सोबत आरोपी १) अनिल सरोज वय सुमारे २७ वर्षे, २) सुनिल सरोज वय सु २० वर्षे सर्व रा. पेनकर पाडा, काशिमीरा, मुळ रा. ठी. जिल्हा जौनपुर उत्तर प्रदेश यांच्या मोठा भाऊ गुलाबचंद सरोज याच्याबरोबर भांडण झाले होते याचा राग मनात धरून आरोपी अनिल व सुनिल यांनी त्यांच्या सोबत राहणारा काल्या ऊर्फ साहेब ऊर्फ राजकुमार अमरनाथ चौहान, वय – १९ वर्षे असे तिघांनी जगरानीदेवी प्रजापती व मुले १) सौ. जगरानीदेवी वय-२७ वर्षे,२) मुलगा कु. प्रमोद, वय ५ वर्षे, ३) मुलगी कु. पिंकी वय ३.५ वर्षे,४) मुलगा कु. चिंटू वय २ वर्षे व५) ३ महिन्याचा लहान मुलगा यांचा चाकु सारख्या तिक्ष्ण हत्याराने निघृण खून करुन त्यांच्या घरास बाहेरून कुलुप लावुन , वापरलेली हत्यारे व अंगावरील रक्ताने माखलेले कपडे आरोपी यांनी स्वतः राहत असलेल्या घरात लपवून ठेवून पळून गेले . सदर घटनेबाबत काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुरक्र १०७/१९९४ गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तलयातील गंभीर व क्लिष्ट स्वरुपांचे खुनाचे गुन्हे उघडकिस आणण्याचे अधिकारी यांनी आदेश केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष -१, काशिमिरा चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकाने जुन – २०२१ मध्ये वाराणसी, उत्तरप्रदेश येथे २० दिवस वास्तव्य करुन स्पेशल टास्क फोर्स (STF), वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश यांच्या मदतीने तपास केला होता. त्यावेळेस आरोपींबाबत कोणतीही ठोस माहीती प्राप्त झाली नव्हती. सदर गुन्हयाचा पोलीस सलग पाठपुरावा करुन आरोपींची माहीती मिळविण्याचे प्रयत्न करीत असतांना आरोपी हे सोहनी, किराकत, जौनपुर, राज्य उत्तरप्रदेश या ठिकाणी स्वतःचे नाव बदलुन कोणासही संशय येणार नाही अश्या रितीने रहात असल्याची तसेच त्यापैकी एक विजय नाव धारण केलेला भुत बाधा उतरवुन देणे, दारु सोडविणे इ. साठी अंगारा / भस्म, मंत्र लिहीलेला कागद इ. देतो व त्याला लोक विजय महाराज ऊर्फ विजय बाबा असे संबोधतात अशी माहीती मिळाली . सदर माहीतीची एसटीएफ व गुन्हे शाखा कक्ष १, काशिमिरा पथकाचे मार्फतीने सहानिशा करुन आरोपी यांची खात्री पटल्यानंतर आरापी १) अनिल उर्फ विजय रामअवध उर्फ अवधु, वय- ४८ वर्षे, २) सुनिल ऊर्फ संजय रामअवध सरोज, वय – ४७ वर्षे, दोन्ही राहणरा ग्राम/पोष्ट सोहानी, तहशिल केराकत, जिल्हा – जौनपुर, राज्य – उत्तरप्रदेश, मुळ राहणार- ग्राम निशान, पोष्ट मुफ्तीगंजत, तहशिल- किराकत, जिल्हा- जौनपुर, राज्य उत्तरप्रदेश यांना दिनांक ०७/१०/२०२३ रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिलेली असुन हत्याकांड केल्यानंतर आरोपी हे बरीच वर्षे दिल्ली, हरीयाणा, पंजाब इ. राज्यांत स्वतःचे अस्तित्व लपवुन वास्तव्य करीत होते. तद्दनंतर ते त्यांच्या मुळ गावापासुन थोडया दुर अंतरावर असणाऱ्या त्यांच्या आजोळी ग्राम सोहानी, तहसिल केराकत, जौनपुर, राज्य उत्तरप्रदेश येथील मावशीकडे स्वतःची नावे बदलुन वास्तव्य करीत होते. आरोपी यांनी बदलेल्या नांवाने आधारकार्ड, रेशनकार्ड बनविले असून मतदान यादीत देखील नाव समाविष्ठ करुन घेतले आहे. खुन केल्यानंतर आरोपी हे आज पर्यंत त्यांचे मुळ गावी गेलेले नसुन काही ठरावीक नातलग सोडुन कोणाच्याही संपर्कात रहात नव्हते.
सदरची कामगीरी मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मा. श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मा. श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त सो, गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा येथील पो.नि. अविराज कुराडे, स.पो.निरी कैलास टोकले, प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, स.फौ. राजु तांबे, संदीप शिंदे, पो.हवा. अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन हुले, सचिन सावंत, समीर यादव, सुधीर खोत, विकास राजपूत, पो.अं. प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, स.फौ. सतोष चव्हाण सायबर विभाग तसेच उत्तर प्रदेश एस.टी.एफ. वाराणशी बँचचे पो.उप अधिक्षक श्री शैलेश प्रताप सिंह, पो. निरी. श्री अमित श्रिवास्तव, पो.उप-निरी. श्री अंगदसिंह यादव, श्री शाहजादा खाँ, श्री ज्ञानेंद्र सिंह पो.हवा. अरविंद सिंह, धनन्जय श्रीवास्तव, ब्रजेश सिंह, राहुल सिंह, सत्यपाल सिंह, पो.हवा. ड्रा. यशवंत सिंह, राजकुमार राय यांनी केली आहे.
