महीलेचा खून करून फरार झालेल्या आरोपीस पतंनगर पोलिसांनी शिताफीने केली अटक .

Crime News

घाटकोपर : पतंनगर पोलीस ठाणे येथे  दिनांक.०२/११ / २०२१ रोजी अज्ञात इसमाने एका महिलेचा शारिरीक अत्याचार करण्याच्या हेतूने खून करून फरार झालेल्या गुन्ह्याची नोंद होती. त्याअनुषंगाने गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन कक्ष ५ कार्यालयामार्फत चार पथके तयार करण्यात आली होती. गुन्हयाच्या घटनास्थळावरील गुन्हा करण्यापुर्वी व गुन्हा केल्यानंतर पळुन जातानाचे अस्पष्ट सी.सी.टी.व्ही फुटेज वरून आरोपी हा अंदाजे ३० ते ४० वर्षे वयोगटातील पुरूष असल्याचे  पोलीस पथकास समजले होते त्यावरून गुन्हेगारांची रूपरेषा तयार करून  आरोपीचा शोध चालू होता त्यातच आरोपी हा पंतनगर, घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, अँटॉपहील , जी.टी.बी नगर, किंग सर्कल, माहीम, बी.के.सी. या ठिकाणी फुटपाथवर बेवारस रित्या वावरत असल्याचे दिसून आले होते. त्याअनुषंगाने वर नमुद परिसरात दिवसा व रात्रौ सापळा लावण्यात आला होता.

त्याचदरम्यान मुंबई शहर व नवीमुंबई येथील पोलीस ठाण्याचा अभिलेख पोलिसांनी तपासला असता वाशी पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आलेला आरोपी व नमुद फुटेजमधील संशयीत आरोपी हा एकच असल्याचे निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने नमुद गुन्हयाची स्थिती असता आरोपीने त्या गुन्हयात देखील एका महीलेचा अत्याचार करून खुन केल्यामुळे सदर गुन्हयात दिनांक १८/११/२०१६ ते दिनांक ०७/१०/२०२१ रोजीपर्यंत तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते . व सदर आरोपी हा दिनांक ७/१०/२०२१ रोजी तळोजा कारागृह येथून मुक्त झाल्याचे समजले. वाशी येथील गुन्हयाची पार्श्वभुमी पाहता  आरोपी पुर्वी नवी मुंबई येथे फुटपाथवर वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाल्याने नवी मुंबई परिसरात खांदेश्वर, मानसरोवर, खारघर, बेलापूर या परिसरात देखील दिवसा व रात्रौ आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथकाने पाळत ठेवली होती. आरोपीच्या फोटो वरून  मुंबई व नवीमुंबई परीसरात फुटपाथवर बेवारसरित्या राहणारे, कचरा वेचणारे इसम यांच्याकडे पोलिसांनी कसुन चौकशी केली असता  आरोपी हा  मानखुर्द व बेलापुर परीसरात वरचेवर येत असल्याचे समजल्याने पोलिसांनी  त्याठिकाणी सापळा रचून  दिनांक १३/११ / २०२१ रोजी सदरचा आरोपी हा मानखुर्द स्टेशन परीसरात दिसुन आल्याने त्यास पथकाने तात्काळ शिताफिने ताब्यात घेतले. सदर संशयीत आरोपीकडे केलेल्या चौकशीवरून त्याने पंतनगर पोलीस ठाणे पंतनगर येथील महीलेच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केल्याचे  त्याने कबूल केले यावरून त्यास पुढील कारवाईकरीता पंतनगर पोलीस ठाण्याच्या  ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मिलिंद भारंबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. एस.विरेश प्रभु सो., मा. पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) श्री प्रकाश जाधव सो, मा. सपोआ श्री. नितीन अलकनुरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष ५ चे प्रभारी पो.नि घनश्याम नायर, पो.नि. सदानंद येरेकर, स.पो.नि. सुशांत बंडगर, स.पो.नि. अर्चना पाटील, स.पो.नि संजय जगताप, स.पो.नि जयदिप जाधव, स.पो.नि अमोल माळी, पो.उ.नि. लक्ष्मण वडरे, स.पो.उनि न्यायनिर्गुणे, यादव, साळुखे, पो.हवा. राणे, भुजबळ, निरभवणे, पैंगणकर, विचारे, मालुसरे, देसाई, पो.ना. सिंग, चिलप, तानाजी पाटील, कांबळे, पो.शि. काळे, मुलानी, प्रमोद पाटील, सावंत. यांनी पार पाडली आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply