विरार : बतावणी करुन सोन्याचे दागिने लंपास करणा-या टोळीला अटक करुन त्यांचेकडुन रु. ४,१०,५००/- किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी हस्तगत केला आहे . नागरिकांना भूरळ घालून त्यांच्या जवळील दागिने वा वस्तू लुबाडून नेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे रोज कुठेनाकुठे अश्या प्रकारच्या घटना होतच असतात. अश्याच प्रकारची घटना विरार येथे घडली अधिक माहिती नुसार दिनांक २५/०४/२०२२ रोजी श्रीमती शायना ननवी, वय ५१ वर्षे या विरार पुर्व येथे मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्याकरिता गेल्या होत्या त्यावेळी अनोळखी व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या गळयातील मंगळसुत्र, सोन्याची चैन, कर्णफुले व अंगठी काढण्यास सांगुन ते रुमालात गुंडाळून ठेवत असल्याचे भासवुन हातचलाखीने शायना ननवी यांचे सोन्याचे दागिने फसवणुक करुन नेले होते. सदरबाबत दिलेल्या तक्रारीवरुन विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा वसई युनिट-२ यांनी तुळींज पोलीस ठाणे येथे अश्या प्रकारे एका चोरीची नोंद होती व त्यातील आरोपी १) संजय राजूभाई सलाड वय-२० वर्षे, २) भिमागाई शांतीलाल राठोड वय ४० वर्षे, ३) अर्जुन शांतीलाल राठोड वय ४० वर्षे सर्व रा. कुबेरनगर, अहमदाबाद गुजरात यांना अटक केले होते. सदर गुन्हयातील आरोपिंना वर नमुद विरार पोलीस ठाण्या कडील गुन्हयामध्ये सहभाग आहे का याची सखोल चौकशी केली असता सदर आरोपीतांचा विरार पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हयामध्ये सहभाग निष्पन्न झाला.पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीत यांनी विरार व तुळींज पोलीस ठाण्याचे एकूण ५ गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपी यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी पाचही गुन्हयातील फसवणुक केलेला माल पालनपुर, जिल्हा बनासकंठा गुजरात येथे गहाण ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार तपासी अधिकारी सपोउनि/सुरेंद्र शिवदे, पोलीस अंमलदार/दिपक जगदाळे, चेतन निंबाळकर यांच्या पथकाने आरोपी अर्जुन राठोड याचेसह खाजगी वाहनाने पालनपुर, गुजरात येथे रवाना झाले व वरिल पाचही गुन्हयातील सुमारे रु. ४,१०,५००/- सोन्याचे दागिने असा १०० % चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाधुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, श्री. सुभाषचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे, सपोउपनि/सुरेंद्र शिवदे, पो.अंम/दिपक जगदाळे, चेतन निंबाळकर यांच्या पथकाने केलेली आहे.
